Salim Dola Case: सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का! मेफेड्रोन तस्करी प्रकरणात दोघांना ईडी कोठडी

मेफेड्रोन तस्करी आणि मनी लाँडरिंग प्रकरण; प्रविण शिंदे आणि बृजेश मोरडिया यांना ८ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी
Salim Dola ED Action
Salim Dola ED ActionPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोला आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मेफेड्रोन (एमडी) तस्करी व मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने दोन प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे आणि बृजेश कांजीभाई मोरडिया अशी त्यांची नावे आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने दोघांना ८ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

ईडीच्या तपासानुसार, सलीम डोला आणि त्याच्या साथीदारांचे नेटवर्क मेफेड्रोनच्या निर्मितीसाठी रसायनांची खरेदी, उत्पादन, वाहतूक आणि विक्री तसेच या व्यवहारातून मिळालेल्या पैशांचे हस्तांतरण करण्यासाठी कार्यरत असल्याचा आरोप आहे.

या पैशांचा वापर हवालामार्फत केल्याचा तसेच काही रक्कम मालमत्ता खरेदीत गुंतवल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.

शिंदेच्या मालमत्तांची चौकशी

ईडीने न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार, प्रविण शिंदेचा सलीम डोला आणि ताहेर डोला यांच्याशी संपर्क होता. शिंदेने आई आणि बहिणीच्या नावावर काही स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात समोर आले असून, त्यासाठी वापरण्यात आलेल्या पैशांचा स्रोत तपासण्याची गरज असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. त्याच्या बँक खात्यांमधील काही व्यवहारही संशयास्पद असल्याचे तपास यंत्रणेने नमूद केले.

Salim Dola ED Action
CM Srushti Scheme: राज्यातील उच्च शिक्षणात आता ‘सी.एम. सृष्टी’; एआयपासून क्वांटम तंत्रज्ञानापर्यंत संशोधनाला मिळणार बळ!

मेफेड्रोन निर्मितीचा आरोप

बृजेश मोरडियाविरुद्धचा तपास मुख्यतः मेफेड्रोनच्या निर्मिती आणि तस्करीशी संबंधित आहे. त्याचाही डोला आणि ताहेर डोलाशी संपर्क असल्याचा ईडीचा दावा आहे. त्याच्याशी संबंधित सुमारे २.७७ कोटी आणि ३०.०९ कोटी रुपयांच्या कथित गुन्ह्यातील पैशांचा माग काढणे बाकी असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.

डोला भारतात परतल्यानंतर तपासाला वेग

सलीम डोला याला एप्रिल २०२६मध्ये तुर्कियेतून भारतात आणण्यात आले होते. एनसीबीने त्याच्याविरुद्धच्या जुन्या अंमली पदार्थ प्रकरणांत तपास सुरू केला. त्यानंतर डोलाच्या कथित आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कच्या आर्थिक व्यवहारांचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्‍यान, सलीम डोला याचे भारतात इतरत्र अमली पदार्थ पुरवठ्यामध्‍ये धागेदोरे आहेत का? याचा तपास सुरू झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Salim Dola ED Action
BEST Mumbai Budget: बेस्टचा खजिना रिकामा, तूट १,३१७ कोटी; तरी मुंबईकरांना बस भाडेवाढीपासून दिलासा!

पूर्वीच तुरुंगात

शिंदे आणि मोरडिया हे दोघेही संबंधित अंमली पदार्थांच्या मूळ गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. ईडीला यापूर्वी कारागृहात त्यांचे जबाब नोंदविण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर मनी लाँडरिंगच्या तपासासाठी ईडीने त्यांची कोठडी मागितली.

न्यायालयाने केस डायरी आणि ईडीच्या रिमांड अर्जाचा विचार केल्यानंतर दोघांचा मेफेड्रोन निर्मिती व तस्करीतील सहभाग प्रथमदर्शनी दिसत असल्याचे नमूद केले. त्यांच्या बँक खात्यांतील व्यवहारांचे स्पष्टीकरण आवश्यक असल्याने पुढील तपासासाठी कोठडी गरजेची असल्याचे न्यायालयाने मान्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news