Free advertising Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये नवरात्रोत्सवाआडून फुकटात जाहिरातबाजी

शहर विद्रुपीकरणासह महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात
Free advertising Navi Mumbai
नवी मुंबईमध्ये नवरात्रोत्सवाआडून फुकटात जाहिरातबाजीpudhari photo
Published on
Updated on

वाशी : नवरात्रोत्सव मंडळांच्या माध्यमातून शहरातील बिल्डर आणि नामांकित कंपन्यांद्वारे त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण शहरामध्ये फुकटात जाहिरातबाजी करण्यात आली आहे. महापालिकेच्या एकाही विभाग अधिकार्‍याने उत्सवादरम्यान कोणत्याही मंडळावर कारवाई केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे एकीकडे शहर विद्रूपीकरणात भर पडत असताना दुसरीकडे महापालिकेच्या लाखो रुपयांच्या महसूलाला फटका बसला आहे.

याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून संबंधितांवर गुन्हे नोंद केल्यास याला आळा बसू शकेल. तसेच संबंधित विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक किंवा अधीक्षक यांनी यावर गुन्हे नोंद करण्याची किंवा दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही राजकीय दबावामुळे अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.

Free advertising Navi Mumbai
Raigad News : खोपोली नगराध्यक्षपदाच्या नव्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

अरेंजा सर्कल, वाशी डेपो, वाशी सेक्टर 17, सेक्टर 1, सेक्टर 15/16,सीबीडी बेलापूर दिवाले गाव, अग्रोली गाव, नेरूळ अक्षर चौक नेरूळ, गायमुख चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी, तुर्भे नाका , तुर्भे स्टोअर, कोपरखैरणे गुलाबसन डेअरी, कोपरखैरणे डी मार्ट, ऐरोली सेक्टर 5 चौक, घणसोली यासह सर्वच ठिकाणी गल्लोगल्ली नवरात्रोत्सव मंडळाच्या लगत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी शुभेच्छा देणारे अनधिकृत जाहिरात फलक लावले आहेत.

तसेच काही मंडळांनी एखाद्या दुसर्‍या कमानीची परवानगी घेऊन अतिरिक्त कमानी लावल्या आहेत. त्याचबरोबर जिथे मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत त्या मंडळांनी खासगी कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या देणग्याच्या पावत्या फाडून त्यांचे जाहिरात फलक मंडळाच्या सभोवतालच्या परिसरात लावले आहेत.

Free advertising Navi Mumbai
Mahad MIDC road construction : महाड एमआयडीसीतील मुख्य रस्त्याचे काम संथगतीने

अशाप्रकारे संपूर्ण शहरात संबंधित मंडळांच्या माध्यमातून शहरातील बिल्डर लॉबी व नामांकित कंपन्यांनी फुकटात जाहिरातबाजी केली आहे. जाहिरातींद्वारे महापालिकेच्या तिजोरीत प्रतिवर्षी लाखो रुपयांचा महसूल जमा होत असतो; मात्र अशा प्रकारे सण, उत्सवांच्या आडून फुकटात जाहिरातबाजी केल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news