Supreme Court : नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम! सर्वोच्च न्यायालयाने राजन विचारेंची याचिका फेटाळली

म्हस्के यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवली असल्याचा आरोप
Supreme Court : नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम! सर्वोच्च न्यायालयाने राजन विचारेंची याचिका फेटाळली
Published on
Updated on

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

नरेश म्हस्के यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवली असल्याचा आरोप राजन विचारे यांनी या याचिकेद्वारे केला होता. तसेच नरेश म्हस्के यांच्यावर कारवाई करून त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र, याचिकेमध्ये कोणतेही ठोस तथ्य नसल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

राजन विचारे यांनी याचिका दाखल करताना दावा केला होता की, म्हस्के यांनी एका दंगलप्रकरणातील शिक्षा निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केली नव्हती. त्यांचा दावा होता की ही माहिती लपवून मतदारांची दिशाभूल करण्यात आली. मात्र न्यायालयाने याचिकेत “ठोस कारण” नसल्याचे सांगत ती फेटाळली.

यावर बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, सत्याचा विजय झाला आहे. माझ्याविरोधात राजकीय हेतूने आरोप करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने तथ्यांच्या आधारे निर्णय दिला असून न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. विरोधकांकडून केवळ आहेत ते कार्यकर्ते थांबवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news