Nalasopara Child Labour: बालमजुराकडून पॅकिंग मशीनवर काम; १३ वर्षीय मुलाची चार बोटे तुटली

कंपनी मालक-व्यवस्थापकावर गुन्हा
Nalasopara Child Labour
Nalasopara Child LabourPudhari
Published on
Updated on

नालासोपारा: नालासोपारा पूर्व येथील पेल्हार गाव परिसरात एका कंपनीमध्ये अल्पवयीन मुलाकडून धोकादायक यंत्रावर काम करून घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ वर्षीय मुलाची चार बोटे तुटून त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पेल्हार गावातील उमर कंपाऊंड परिसरातील एका कंपनीत एक १३ वर्षीय मुलगा काम करत होता. अल्पवयीन असूनही कंपनी व्यवस्थापनाने त्याला कामावर ठेवले होते.

Nalasopara Child Labour
Kalwa Illegal Mosque Construction: अनधिकृत मशिदीच्या बांधकामाला सहायक आयुक्त जबाबदार; आमदार संजय केळकर यांनी केली कारवाईची मागणी

तसेच तो प्रशिक्षित नसल्याची आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असूनही त्याच्याकडून पॅकिंग मशीनवर काम करून घेतल्याचा आरोप आहे.काम करत असताना मुलाचा हात मशीनमध्ये अडकला आणि अंगठ्यासह चार बोटांना गंभीर दुखापत झाली.

Nalasopara Child Labour
Ration Card Names Missing: मिरा-भाईंदरमध्ये गरीबांच्या ताटावर घाला! रेशनकार्डमधून हजारो नावे गायब

या अपघातात चार बोटे पूर्णपणे तुटल्याने मुलास कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचे आरोप करण्यात आले आहे.सुरक्षा नियमांचे पालन न करणे, अल्पवयीन मुलाकडून धोकादायक काम करून घेणे आणि निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात घडल्याप्रकरणी कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांच्याविरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news