Kalwa Illegal Mosque Construction: अनधिकृत मशिदीच्या बांधकामाला सहायक आयुक्त जबाबदार; आमदार संजय केळकर यांनी केली कारवाईची मागणी

ध्यंतरी हे काम थांबविण्यात आले होते, मात्र आता ते पुन्हा सुरू झाले आहे.
Kalwa Illegal Mosque Construction
Kalwa Illegal Mosque ConstructionPudhari
Published on
Updated on

ठाणे: कळव्यातील वाघोबानगर येथील अनधिकृतपणे सुरू असलेल्या मशिदीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांवर कारवाई करावी, अन्यथा हिंदू संघटना मोर्चा काढून प्रशासनाला ताळ्यावर आणतील, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या १०७व्या उपक्रमात अनधिकृत बांधकामे आणि विकासकांकडून होत असलेल्या फसवणुकीचा मुद्दा गाजला. कळवा येथील वाघोबानगर परिसरात अनधिकृत मशिदीचे बांधकाम सुरू आहे. मध्यंतरी हे काम थांबविण्यात आले होते, मात्र आता ते पुन्हा सुरू झाले आहे.

Kalwa Illegal Mosque Construction
Mumbai Metro: पावसाळ्‍यात मेट्रो अखंडित सुरू राहणार; एमएमआरडीएकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहून याबाबत निवेदन दिले. केळकर यांनी संबंधित सहायक आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

केळकर म्हणाले, अनधिकृत मशिदीच्या बांधकामाला कळवा प्रभाग समितीचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याने सहायक आयुक्तांवरच प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केळकर यांनी केली. बांधकाम भव्य झाल्यावर प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न विचारत तत्काळ कारवाई न झाल्यास हिंदू संघटना बांधकामस्थळी भव्य मोर्चा काढतील, असा इशाराही केळकर यांनी केला.

कार्यक्रमात शहरातील चार ठिकाणचे रहिवासी, संबंधित विकासक उपस्थित होते. विविध कारणे सांगून विकासक घरे देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी या रहिवाशांनी केल्या. या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे रहिवाशांना मुदतीत घरे देण्याबाबत आश्वासित करण्यात यावे, अशा सूचना केळकर यांनी उपस्थित विकासकांना दिल्या.

अन्यथा रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असे विचारत पुढील कारवाईचे संकेत दिले. वर्तकनगर येथे म्हाडाची इमारत तयार असून वरील निवासी सदनिकांचा प्रश्न मार्गी लागला असला तरी दुकानांच्या गाळ्यांचे हस्तांतरण गेली आठ वर्षे रखडले आहे.

Kalwa Illegal Mosque Construction
Bhiwandi Dangerous Buildings: भिवंडीत १,४३९ धोकादायक इमारती

याबाबत केळकर यांनी म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत गाळेधारकांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे केळकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news