Shaina NC Defamation Case: शायना एन. सींविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा कोणी आणि का ठोकला?

Syed Muzaffar Hussain: गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या त्या 11 जणांनी मुझफ्फर यांचा फोटो व्हायरल केला होता.
Shaina NC
Shaina NCPudhari
Published on: 
Updated on: 

Shaina NC Vs Syed Muzaffar Hussain Defamation Case

भाईंदर : गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने माजी आ. मुझफ्फर हुसैन यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी भाजपने त्यांचा अपप्रचार केल्याविरोधात त्यांनी भाजप प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्यासह 11 जण तसेच 'आमची मुंबई' या 2 फेसबुक पेजवर 100 कोटींचा मानहानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती मुझफ्फर यांनी बुधवारी मिरा रोडच्या अस्मिता क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

याप्रकरणी त्यांनी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला असून तत्पूर्वी ही बाब त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्यानेच त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

Shaina NC
Bombay Highcourt: वडिलांच्या मृत्यूनंतरही विवाहित मुलींचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क : मुंबई हायकोर्ट

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या त्या 11 जणांनी मुझफ्फर यांचा एका दहशतवाद्यासोबतचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल करुन फोटोत त्यांच्या शेजारी बॉम्ब सारखी विध्वंसक शस्त्रे दाखविली होती. मुझफ्फर हे मुस्लिम धर्मातील असल्याने या धर्माविरोधात भाजपकडून अपप्रचार करण्यात आल्याने मुझफ्फर यांनी ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत कारवाई करण्याची मागणी केली. मात्र निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे त्यांनी मिरारोड पोलीस ठाण्यात एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा का दाखल केला म्हणून त्यांच्यावर भाजपने दबाव आणला. आणि पोलिसांनी पुढील कारवाई बासनात गुंडाळून ठेवली. यामुळेच उच्च न्यायालयात दावा केल्याचे मुझफ्फर यांनी सांगितले.

न्यायालयाने एकूण 13 पैकी 11 जणांना नोटीसा बजाविल्या असून उर्वरीत 2 फेसबुक पेज बंद करण्यात आल्याने त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात आपण आजारी असल्याकारणाने दावा दाखल करण्यास उशीर झाल्याचे सांगून त्यांनी आगामी पालिका निवडणुकीत असे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याबाबत मंगळवारी पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने धर्माचा आधार घेत प्रचार केला. त्याविरोधात सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. पण आयोगाने त्यावर सुद्धा कारवाई करणे टाळले.

Shaina NC
Mira Bhayandar News: मूळ आगरी, कोळी समाजाच्या मिरा- भाईंदरमध्ये परप्रांतियांचं वर्चस्व कसं निर्माण झालं?

काँग्रेसने 70 वर्षांत देश चांगला चालविल्याचा दावा करीत त्यांनी भाजपने मात्र 11 वर्षांत देशाचे वाटोळे केल्याचा आरोप केला. भाजपने देशभर सुरु केलेल्या बटोगे तो कटोगे विरोधात कोणीतरी उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत 145 मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रात सुमारे 40 ते 50 हजार बोगस मतदारांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यावेळच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी व तहसीलदारांनी हि मानवी चूक असल्याचा निर्वाळा देत त्यावर गांभीर्य दाखविले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.