

मुरबाड: निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नुकतीच १३९ मुरबाड विधानसभा मतदारसंघाची विशेष सखोल पुनरिक्षण यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या यादीतून तब्बल १ लाख ३४ हजार ४०६ मतदारांची नावे वगळण्यात आली. म्हणजेच एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २७.३२% टक्के इतके असून हे मतदार गेले कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वेळेस मुरबाड आणि अंबरनाथ मतदारसंघातील बदलापूर चे मतदार मिळून मुरबाड मतदार संघात एकूण मग ४ लाख ९१ हज ९८० मतदारांची नोंद होती.
निवडणूक आयोगाने सर्व मतदार संघांची सखोल पुनरीक्षण यादी तयार करण्याचे काम ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून यादीतून दुबार नावे, मयत मतदारांची नावे वगळण्यात आली यानुसार मुरबाड मतदार संघातील नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत ३लाख ५७ हजार ५७४ मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
ही यादी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्ट रोजी मुरबाड विधानसभा मतदार संघाची विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ अंतर्गत नवी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरम्यान ही यादी तयार करण्यापूर्वी मुरबाड मतदार संघात एकूण ४ लाख ९१ हजार ९८० मतदार पूर्वीच्या यादीत होते. यादी पुनरिक्षणानंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघात तीन लाख ५७ हजार ५७४ मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात मुरबाड नगरपंचायत, कुळगाव बदलापूर नगर परिषद, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागाचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीतून नावे वगळण्यात आलेल्या मतदारांच्या दावे व हरकती नोंदवण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे.
३२ हजार नावांमध्ये तफावत
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील एकूण ६६ हजार ११३ मतदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे त्यापैकी ३३ हजार ५८३ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही तर ३२ हजार ५२८ मतदारांच्या नावामध्ये तफावत आढळली आहे. या सुनावणीसाठी २१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत बदलापूर मध्ये ११ अंबरनाथ २ कल्याण २ मुरबाड शहर एक व मुरबाड ग्रामीण मध्ये ५ ठिकाणी सुनावणी घेण्यात येणार आहे अशी माहिती मुरबाड तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी दिली.