Khpoli Crime News: मखर सजावटीच्या वादातून आईच्या डोक्यात हातोडीचा घाव; मुलाला अटक

खोपोलीतील नडोदे गावात गणेशोत्सवाच्या मखर सजावटीचे साहित्य कुठे ठेवले, या कारणावरून वाद झाला. मुलाने वृद्ध वडिलांना मारहाण केली आणि मध्यस्थी करणाऱ्या आईच्या कपाळावर हातोडीने प्रहार केल्याप्रकरणी तुषार येरुणकर याला अटक करण्यात आली.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

खोपोली: गणेशोत्सवाच्या मखर सजावटीचे साहित्य कुठे ठेवले आहे, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. मुलाने वृद्ध वडिलांना कानफडीत मारल्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या आईच्या कपाळावर हातोडीने प्रहार करून तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना नडोदे गावात घडली.

नडोदे येथे राहणारे तुळशीदास येरुणकर (वय ७४) यांच्या जुन्या घरी त्यांचा मुलगा तुषार येरुणकर हा गेला होता. त्याने मखर सजावटीचे साहित्य कुठे ठेवले आहे, अशी विचारणा करत मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केली. यावेळी तुळशीदास यांनी, यावर्षी लहान मुलगा गणपती बसवत असून सजावटीची तयारी आम्ही केली आहे, असे सांगून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

Crime News
Raigad Teacher: ३५१ शिक्षक भरले, तरी २० शाळांमध्ये एकही शिक्षक नाही! रायगडमधील सहा तालुक्यांचा प्रश्न कायम

मात्र, तुषारने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने तुळशीदास यांनी त्याला गोंधळ करू नकोस, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून तुषारने वडिलांच्या कानफडीत मारली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आई सुनीता येरुणकर मध्ये गेल्या असता तुषारने त्यांच्या कपाळावर हातोडीने प्रहार केला. यात सुनीता जखमी झाल्या.

तुळशीदास यांचा पुतण्या दर्शन हा भांडण सोडविण्यासाठी आला असता तुषारने त्याला शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत दर्शन यालाही दुखापत झाली.या प्रकरणी तुळशीदास येरुणकर यांनी मुलगा तुषार येरुणकर याच्याविरोधात खालापूर पोलीसांत तक्रार दाखल केली.

Crime News
Raigad ST Bus: गणेशभक्तांनो, परतीच्या प्रवासाची चिंता नको! रायगड एसटीच्या ४३९ बसेस सज्ज; २६५ अतिरिक्त बसेसही तयार

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला नोटीस बजावली असून चौकशी नंतर अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पो. नि. प्रदीप रायन्नवर यांनी दिली आहे.

अखेर अटक....

तुळशीदास यांचा पुतण्या दर्शन हा भांडण सोडविण्यासाठी आला असता तुषारने त्याला शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या या प्रकरणी तुषार येरुणकर यास अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news