Rave Party Culture: इव्हेंटच्या नावाखाली फोफावतेय रेव्ह पार्टी कल्चर; तरूणाईला Narcos चा विळखा

Rave Party Culture
Rave Party Culturepudhari
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील नेस्को ड्रग्ज पार्टीचे कनेक्शन कल्याण पर्यंत येऊन पोहचले आहेत. मुंबई पोलिसांनी नेस्को ड्रग्ज पार्टीत ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या एका महिलेस अटक केली असून तिच्या आलिशान घरातून 6 कोटी रुपये किमतीच्या 5 हजार एक्स्टसी ड्रग्जच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आदी बड्या शहरात इव्हेंटच्या नावाखाली आयोजित होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये ही महिला ड्रग्ज विक्री करीत होती असे पोलीस तपासातून समोर आले आहे. त्यामुळे अलीकडे इव्हेंट व म्युझिक कॉन्सर्टच्या आडून ड्रग्जच्या रेव्ह पार्ट्यांचे कल्चर वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Rave Party Culture
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर ड्रग्जच्या ओव्हरडोज मुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मुंबईमधून पाच जणांना तर कल्याण नजीकच्या टिटवाळा शहरातून एका महिलेस या पार्टीत ड्रग्ज पुरवठा केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अश्विनी फ्रान्सिस पॉल असे टिटवाळा मधून अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती पूर्वी डान्स बार मध्ये काम करीत होती अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

मुळची पुण्याची रहिवाशी असलेली अश्विनी फ्रान्सिस पॉल ही नवी मुंबईत राहत होती. तीने आपल्या पहिल्या पतीस सोडले असून ती सध्या तिच्या बॉयफ्रेंड सोबत कल्याण टिटवाळामधील पद्मावती रॉयल्स, इमारत नंबर दोनमध्ये रूम नंबर 705 मध्ये राहत होती. म्युझिक कॉन्सर्ट व इव्हेंटच्या नावाखाली आयोजित होणाऱ्या ड्रग्ज रेव्ह पार्टीत ती ड्रग्ज सप्लाय करीत होती असे देखील पोलीस तपासातून उघड झाल्याने पोलीस आता तिची कसून चौकशी करीत आहेत. ऑनलाइन व व्हाट्सएपच्या माध्यमातून अशा पार्ट्यांचे मॅसेज पाठवून अशा पार्ट्यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली जात होती. दरम्यान, या प्रकरणामुळे म्युझिक कॉन्सर्ट व इव्हेंटच्या नावाखाली आयोजित होणाऱ्या ड्रग्ज रेव्ह पार्टीचे काळे कारनामे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Rave Party Culture
Mumbai News : नेस्को सेंटरच्या पार्टीसाठी कुरिअरने पाठवले ड्रग्ज

व्हॉट्सअॅप ग्रुप

रेव्ह पार्टी हा मुख्यतर धनदांडग्या लोकांचा रिकामटेकडा पण तितकाच खर्चिक उद्योग म्हटलं तर वावगं होणार नाही. रेव्ह पार्टी म्हणजे दारू, नाच-गाणं, ड्रग्ज आणि सेक्स यांचं कॉकटेल असतं. रेव्ह पार्टी अत्यंत गुप्तपणे एखाद्या निर्जनस्थळी आयोजित करण्यात येते. मुंबई ठाण्यातील सुमारे 150 हुन अधिक बड्या हॉटेल्स आणि क्लब अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन अत्यंत गुप्तपणे करतात. त्यासाठी पार्टी आयोजकांनी वेगवेगळे व्हॉट्सअँप ग्रुप बनवले आहेत.

या ग्रुप मध्ये फक्त अशाच लोकांना सामील करून घेतलं जातं जो आधीच्या ग्रुप मेम्बरच्या ओळखीचा आणि विश्वासू असतो. ग्रुपच्या माध्यमातून मॅसेज टाकून या पार्ट्यांची प्रसिद्धी केली जाते. रेव्ह पार्ट्यात सहभागी होण्यासाठी लागणारी इन्ट्री फी, दारू व ड्रग्जचे प्रकार आणि इतर सुख सुविधांची यादी या ग्रुपवर वेळीवेळी टाकण्यात येते. साहजिकच या यादीत अश्लीलतेचा प्रकार देखील सामील असतो.

अशा रेव्ह पार्ट्या खासकरून ख्रिसमस, थर्टीफस्ट डिसेंबर आणि प्रत्येक विकेंडला आयोजित करण्यात येतात. सध्या मुंबई-ठाण्यात अशा पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याने आयोजक इव्हेंट अथवा म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली अशा पार्ट्या आयोजित करतात. या पार्ट्यांमध्ये श्रीमंतीचा थाटमाट असणारी लोकं आधी हजेरी लावत असत. पण हल्ली या रेव्ह पार्ट्यात मध्यमवर्गीय घरातील तरुण मुलं देखील हजेरी लावू लागली आहेत.

Rave Party Culture
Satara drug racket | सातार्‍यात खुलेआम ड्रग्ज-गांजा.., ‘फूक गांजा... घे कोयता अन् घाल डोक्यात!’

ड्रग्जचा बाजार

नवनव्या प्रकारांच्या ड्रग्जध्यास प्रचारासाठी देखील या रेव्ह पार्ट्या कुप्रसिद्ध आहेत. एखाद्या ड्रग्ज माफियाने नवा ड्रग्जचा प्रकार मार्केट मध्ये आणला की त्याचा नमुना अशा पार्ट्यांमध्ये वाटला जातो. नवा ड्रग्जचा नमुना तरुणांना दिला की त्याची जाहिरात होते व मागणी वाढू लागते. त्या ड्रग्जला कोड लँग्वेज मध्ये काय म्हणायचं, ते कुठे उपलब्ध होईल व त्याची किंमत काय असणार ह्या सगळ्या बाबी अशा पार्ट्यांमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. एकप्रकारे रेव्ह पार्टी म्हणजे ड्रग्ज विक्रीचा सगळ्यात मोठा प्लँटफॉर्मच आहे.

पेपरबॉम्ब म्हणजेच एलएसडी पेपर, एमडी, एफ़ेड्रीन, बाटला, क्रिस्टल, एमडीएम, अस्प्रिंन, क्रॅक, हॅश, हुक्का पेन, बच्चू टॅबलेट, कोकेन आदी नवनव्या ड्रग्सची येथे सर्रास विक्री केली जातेय. इतकेच नव्हे तर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कफ सिरफ, व्हाईटनर, डोकेदुखीत वापरण्यात येणारे बाम, पॉवरफुल पेन किलर आदी औषधींचा देखील नशेसाठी सरार्स वापर करण्यात येतो. हे सारे ड्रग्ज इतके पावरफुल असतात की ते सेवन केल्यावर आपण सुपरहिरो असल्याचा भास होऊ लागतो व तरुण मुलं ते सेवन करून सलग आठ-आठ तास डिजेवर नाचतात. या ड्रग्जला म्याव म्याव, पावडर, माल, गोली, पेपरबॉम्ब, अशी वेगवेगळी कोड भाषेतली नावे असतात.

Rave Party Culture
Chatrapati Sambhajinagar Crime : ड्रग्ज माफियांच्या टोळीची बेड्या घालून काढली धिंड

काळा चेहरा जगासमोर

अशा रेव्ह पार्ट्यांची दुसरी काळी बाजू म्हणजे अश्लीलता व सेक्स रॅकेट होय. ड्रग्ज घेतल्याने शरीरातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते व त्याच नशेच्या आहारी जाऊन या पार्ट्यांमध्ये अश्लीलतेचा बाजार मांडला जातो. उचभ्रू पार्ट्यांमध्ये व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन वाम मार्गाला लागलेल्या तरुणींपासून तर अगदी मॉडेल व टीव्ही जगतातील स्ट्रगलर हिरॉइन्स देखील हजेरी लावतात. त्यातील अनेकजणी ह्या कॅलगर्ल्स म्हणून या पार्ट्यांमध्ये वावरतात.

Rave Party Culture
Pune Crime Review 2025: गुन्हेगारी, अपघात, ड्रग्ज रॅकेट्स; 2025 मध्ये पुणे हादरले

असे होते आयोजन...

रेव्ह पार्ट्या यापूर्वी मुंबई, पुणे, दिल्ली अशा मोठ्या शहरात होत होत्या. शहरात असलेले बडे क्लब व हॉटेल्स अशा पार्ट्या आयोजित करत असत. विकेंडला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा क्लब व हॉटेल्समध्ये नेहमीच नवनवीन पार्ट्या आयोजित केल्या जातात व त्यात विशेष ऑफर्स देखील देण्यात येतात. त्याच पार्ट्यांमधून रेव्ह पार्टी हा प्रकार समोर आला व श्रींमंतांच्या बिघडलेल्या तरुण वर्गात लोकप्रिय देखील झाला. मात्र शहरात अशा पार्ट्या आयोजित केल्या तर त्याची खबर पोलिसांना मिळायची. त्यामुळे मुंबईसह इतर बडया शहरातील क्लब व मोठ्या हॉटेल व्यवसायिकांनी म्युझिक कॉन्सर्ट व इव्हेंटच्या नावाखाली ह्या पार्ट्या आयोजित करण्यास सुरवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news