Mumbai drug party : नेस्को सेंटरच्या पार्टीसाठी कुरिअरने पाठवले ड्रग्ज

कल्याणच्या आनंद पटेलचा उद्योग; ॲपवर ऑर्डर, घरपोच ड्रग्ज
Mumbai drug party
Mumbai drug partypudhari photo
Published on
Updated on

मुंबई : गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील लाईव्ह कॉन्सर्ट तथा ड्रग्ज पार्टीसाठी दीड हजार रुपयांत एमडी ड्रग्जची एक गोळी विकण्यात आली. कल्याणला राहणारा कथित बिल्डर आनंद पटेलने या गोळ्यांचा पुरवठा केला. हा पटेल कुरिअरनेदेखील ड्रग्ज पुरवायचा, असे धक्कादायक तपशील पोलिसांच्या तपासातून पुढे आल्याने मुंबईला ड्रग्जने कसे पोखरले आहे याचे भयंकर चित्र स्पष्ट होत आहे.

गेल्या शनिवारी नेस्को सेंटरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान मद्यपान आणि त्यासोबत एमडी ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने बिस्मतसिंह अमरजीत सिंह आणि श्रेया राय या दोघांचा मृत्यू झाला. शीतल साळवी या मराठी मुलीवर उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदवला गेला आहे.

Mumbai drug party
Ahilyanagar Municipal Election Violence: अहिल्यानगर महापालिका निवडणूक: भाजप-सेना समर्थकांमध्ये सशस्त्र हाणामारी

आतापर्यंतच्या तपासानुसार नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टीसाठी प्रतिक पांडेने आनंद पटेलकडून दीड हजारांत एक एमडी ड्रग्जची गोळी घेतली. आनंदने अशा दहा गोळ्या त्याला दिल्या. विशेष म्हणजे त्याने आनंदकडून यापूर्वीही ड्रग्ज विकत घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

शीतल साळवीच्या जबाबानंतर पोलिसांनी सहाजणांना अटक केली. त्यात रौनक राहुल खंडेलवाल, आकाश बनमारी सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बलराम कुरुप, प्रतिक बिजेश पांडे आणि आनंद लक्ष्मण पटेल यांचा समावेश असून ते सर्वजण सध्या 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. रात्री उशिरा एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात पोलिसांनी बाराजणांचे जबाब आतापर्यंत नोंदवले.

Mumbai drug party
Chhatrapati Sambhajinagar Crime : अंधा फिरोजच्या भावासह एकाला बेड्या
  • नेस्को सेंटरमध्ये गेल्या शनिवारी 11 एप्रिल रोजी झालेल्या कॉन्सर्टचे पास 25 विद्यार्थ्यांच्या गटाने ऑनलाईन पद्धतीने खरेदी केले होते.

  • एका पासची किंमत 3 लाख, 1.5 लाख आणि 1 लाख अशी होती. या कॉन्सर्टमध्ये सुमारे 4 हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

  • प्रतिक पांडेने प्रत्येकी दीड हजार दराने आनंद पटेलकडून ड्रग्जच्या दहा गोळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घेतल्या होत्या. या गोळ्या एका ॲपच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या.

  • सूत्रांच्या माहितीनुसार शीतल साळवीने आपल्या जबाबात गेल्या वर्षी झालेल्या अशाच एका कॉन्सर्टमध्ये एक्स्टसी या अमली पदार्थाचे सेवन केल्याचे सांगितले. याचा अर्थ मुंबईतील अशा कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा शिरकाव कधीच झाला आहे.

दुसरी गोळी आणि थेट रुग्णालयात शुद्ध आली

आमचा गट रात्री 9.30 वाजता नेस्को कॉन्सर्टमध्ये पोहोचला. तिला आणि तिच्या एका मैत्रिणीला एक पिवळी गोळी पाण्यासह देण्यात आली. त्यानंतर या कॉन्सर्टमधील नृत्यात आम्ही सर्व जण सहभागी झालो. मध्यरात्रीनंतर मी आणखी एक गोळी घेतली. त्यानंतर मला थेट रुग्णालयात आल्यानंतर शुद्ध आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news