Mira Road Woman Harassment Case: मिरा रोडवर अपघातानंतर महिलेला शिवीगाळ; दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा

स्कूटीला धडक दिल्यानंतर ४७ वर्षीय महिलेला धमकी आणि विनयभंग केल्याचा आरोप; मिरारोड पोलिसांकडून तपास सुरू
Mira Road Woman Harassment Case
Mira Road Woman Harassment CasePudhari
Published on: 
Updated on: 

मिरा रोड: मुलीला शिकवणी वर्गावरून घरी परतणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन अपघात घडवल्यानंतर, अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मिरा रोड भागात घडला आहे. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड येथील आकृती गार्डन, आयरिस हबटाउन परिसरात राहणारी ४७ वर्षीय महिला २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आपल्या मुलीला ट्युशनवरून सोडून स्कूटीने घरी जात होत्या.

Mira Road Woman Harassment Case
Bhiklya Dhinda: तारपावादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांचा वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाकडून सन्मान

बेव्हर्ली पार्क रोडवरील मेरी गोल्ड बिल्डिंगच्या बाजूला आल्यानंतर समोरून अचानक एक स्कूटी आली आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे फिर्यादी महिला स्कूटीसह रस्त्यावर खाली पडल्या आणि त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली.

अपघातानंतर त्या स्कूटीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी मदत करण्याऐवजी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

Mira Road Woman Harassment Case
Palghar Water Crisis: पालघरमध्ये जलसंधारणाचे शेकडो बंधारे कोरडेच; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मिरारोड पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमासह मोटार वाहन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून अज्ञात दुचाकीस्वारांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.