Palghar Water Crisis: पालघरमध्ये जलसंधारणाचे शेकडो बंधारे कोरडेच; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

बंधाऱ्यांमधून वाहणारे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना नाहीत
Palghar Water Crisis
Palghar Water CrisisPudhari
Published on: 
Updated on: 

पालघर: जिल्ह्यातील जलस्रोतांवर बांधलेल्या बंधाऱ्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी जिल्हा परिषद, जलसंधारण, पाटबंधारे आणि वनविभागांकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो बंधारे कोरडे पडल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरआगामी काळात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता असताना पाणी अडवण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ऑक्टोबर महिन्यात या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतरही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोपी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केला आहे.तातडीने पाणी अडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रफुल पाटील यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजीच जिल्हा प्रशासनाला लेखी पत्र देऊन बंधाऱ्यां मधून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

Palghar Water Crisis
Thane Rickshaw Strike: रिक्षा-टॅक्सीचा संप महिनाभरासाठी टळला! ११ पैकी आठ मागण्या मान्य

मात्र, मागणी केल्यानंतर महिना भरा पेक्षा अधिक अवधी झाला असून अंमलबजावणी झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण केला असता, तर आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत झाली असती.

मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उपलब्ध जलसंधारणाच्या सुविधांचाही अपेक्षित वापर होत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा परिषद, पाटबंधारे, मृदसंधारण, कृषी तसेच वनविभागाला तातडीने निर्देश देऊन वाहणारे पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्यांवर फळ्या बसविणे, सिमेंट-मातीच्या गोण्यांच्या साहाय्याने पाणी अडविणे आणि जलसाठा वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

पाण्याच्या बेसुमार उपशावरही नियंत्रण आणणे आवश्यक

एकीकडे संभाव्य पाणीटंचाईचे संकट डोळ्यांसमोर असताना दुसरीकडे पाणी अडविण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांचा प्रभावी वापर होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Palghar Water Crisis
Tata Power project: टाटा पॉवरच्या ब्लास्टिंगविरोधात ग्रामस्थ आक्रमक; उपोषणाचा इशारा

पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार, याकडे पालघर जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. पाणी अडविणे पुरेसे नसून भूजल आणि उपलब्ध जलस्रोतांमधून होणाऱ्या पाण्याच्या बेसुमार उपशावरही नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.