Mira Road accident death : मिरा रोडमध्ये खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

घातपात आहे की विचित्र अपघात, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा
Mira Road accident death
मिरा रोडमध्ये खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यूpudhari photo
Published on
Updated on

मीरा रोड :भाईंदर पूर्वेच्या नवघर रोड परिसरात रविवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत व्यक्तीचे नाव इंद्रजित यादव (वय 58) रा. विकास उद्योग नगर, भाईंदर असे असून खिडकीच्या लोखंडी ग्रीलमध्ये मान अडकलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडल्याने, हा घातपात आहे की विचित्र अपघात, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवघर रोडवरील क्लासिक स्टील इंडस्ट्रीमध्ये रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीचे शरीर विचित्र स्थितीत होते. त्यांचे अर्धे शरीर खिडकीच्या आत तर अर्धे खिडकीच्या बाहेर लटकलेले होते. हे दृश्य पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच मीरा रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Mira Road accident death
झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी महिला-पुरुषाचे कुजलेले मृतदेह सापडले

पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासासाठी फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जात आहे. पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, हा दुर्दैवी अपघात असण्याची शक्यता आहे. संबंधित व्यक्तीचा मोबाईल खिडकीबाहेर पडला होता. तो उचलण्यासाठी खिडकीतून वाकले असताना त्यांचा तोल गेला असावा व मान ग्रीलमध्ये अडकली असावी. ग्रीलमध्ये मान घट्ट अडकल्याने श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच हा अपघात होता की घातपात, हे स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारे मृतदेह सापडल्याने कामगारांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून, या गूढ मृत्यूचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Mira Road accident death
Crime News : महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या त्या तरुणाचाच निघाला मृतदेह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news