झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी महिला-पुरुषाचे कुजलेले मृतदेह सापडले

पिंपळगाव ठोंबरे शिवारातील घटना ; जीवन संपवले की घातपात? गूढ अधिकच गडद
Parbhani Crime News
झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी महिला-पुरुषाचे कुजलेले मृतदेह सापडलेFile Photo
Published on
Updated on

The decomposed bodies of an unidentified man and woman were found hanging from a tree

परभणी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे शिवारात मंगळवारी (दि.21) सकाळी उघडकीस आलेल्या थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. शेतशिवारातील निर्जन भागात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी महिला व पुरुषाचे कुजलेले मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Parbhani Crime News
Parbhani crime | चुडावा पोलीस हद्दीत आढळला रक्तबंबाळ अवस्थेतील वृद्धाचा मृतदेह

गेल्या काही दिवसांपासून या भागात दुर्गंधीचा तीव्र त्रास जाणवत होता. मात्र निर्जन परिसर आणि शेतशिवारातील दुर्लक्षित भाग असल्याने कोणाच्याही लक्षात हा प्रकार लवकर आला नाही. अखेर दुर्गंधी असह्य झाल्यानंतर स्थानिकांनी शोध घेतला असता हा भीषण प्रकार समोर आला आहे.

प्राथमिक तपासात दोन्ही मृतदेह एकाच झाडाला ओढणीच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहेत. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना साधारण एक आठवड्यापूर्वी घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Parbhani Crime News
Beed Murder | खुनाचा थरार! पत्नीची हत्या करून थेट अंत्यसंस्काराचा प्रयत्न, भावाच्या सतर्कतेमुळे पती पोलिसांच्या ताब्यात

मात्र ही घटना आत्महत्या आहे की सुनियोजित घातपात, याबाबत अद्याप संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. घटनेची माहिती मिळताच दैठणा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. परिसराची सखोल पाहणी करून दोन्ही मृतदेह परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सध्या मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे या दोघांची ओळख पटविणे हेच आहे. परिसरातील गावांमध्ये हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येत असून, सर्व शक्य दृष्टीकोनातून तपास सुरू करण्यात आलेला आहे.

या धक्‍कादायक प्रकारामुळे परभणी जिल्ह्यात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ही आत्महत्या आहे की कुणीतरी रचलेला भयानक डाव? असा प्रश्‍न सर्वत्र चर्चिला जात आहे. तपासानंतरच या गूढ घटनेचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news