Mira bhayander corporator case: मिरा-भाईंदरमधील नगरसेवकावर 40 वर्षीय महिलेचा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mira bhayander corporator case
Mira bhayander corporator casefile photo
Published on
Updated on

मिरा रोड: मिरा-भाईंदर महापालिकेतील एका नगरसेवकावर एका 40 वर्षीय महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, करण्यात आलेल्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी संबंधित पीडित महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. एका सत्ताधारी नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Mira bhayander corporator case
Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय बालकाचा मृत्यू

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै 2022 मध्ये कार्यालयात बोलावून घेत तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईतील गोराई बीच येथील एका लॉजवर नेऊन पुन्हा अत्याचार केला.

त्यानंतर पीडितेच्या घरात वकार्यालयातही अनेकदा तिच्यावर बळजबरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पीडितेला पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास धमकी दिल्याने पीडिता मानसिक तणावाखाली होती. सुरुवातीला मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असल्याचा पीडितेने आरोप केला आहे.

मात्र सोमवारी रात्री अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, काही वेळातच नवघर पोलिसांनी नगरसेवकाच्या तक्रारीवरून पीडित महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Mira bhayander corporator case
Mahad Market News: पोलादपूर तालुक्यात ‌‘आगोट‌’च्या तयारीचे महिलांना वेध; कडधान्ये,सुकी मच्छी खरेदीची लगबग

निवडणूक जिंकल्यानंतर संबंधित महिलेने आपल्याकडे 3 बीएचके फ्लॅट, एक दुकान आणि 250 ग्रॅम सोन्याची मागणी करत खंडणी मागितल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news