

पोलादपूर: पावसाळा सुरू होण्यास अजून महिनाभराचा अवकाश आहे. परंतु पावसाळ्यासाठी लागणारे बेगमीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची दुकानातून गर्दी करताना दिसून येत आहे. बाजारातून कांदे, बटाटे, लसूण, मसाल्याचे पदार्थ शिवाय सुक्या मासळीच्या खरेदीवर सर्वसामान्यांचा विशेष भर आहे.
दरवर्षी महाड बाजारपेठ व तालुक्यात देशी कडधान्यांची लाखो रुपयांची उलाढाल केवळ दोन महिन्यांतच होत असते. कडधान्यांमध्ये महाडचा वाल, नरवणची चवळी, गोरेगावचे मूग व महाडची मटकी प्रसिद्ध आहे. सर्व कडधान्यांची मिळून 60 ते 70 टनाची विक्री होत असते. कडधान्यांमध्ये सर्वाधिक पसंती व विक्री वाल व मटकीची होत असते.
गतवर्षी 9 मे ला पावसाळा सुरू झाल्याने अनेक जणांनी धांदल उडाली होती या वर्षी अनेक ठिकाणी गारवा पडल्याने एप्रिल महिन्या पूर्वी खरेदी केली आहे गेले तीन चार दिवस वातावरणातील बदल ही पाऊस पडण्याची भीती निर्माण करत असल्याने महिला वर्ग सुद्धा युद्ध पातळीवर कडधान्य मिरची सह मसाले याची बेगामी करत वाळवून साठवून ठेवले आहेत काही महिला वर्ग पापड फेण्या शेवया च्या तयारीला लागले आहेत.
पावसाळ्यात शेती हंगामात न मिळणा-या वस्तू व त्यावेळेस सा-याच वस्तूंचे भाव चढे असल्याने पावसाळयासाठी व दैनंदिन लागणाऱ्या रोजच्या आहारातील वस्तूंची साठवण करण्याठी ग्रामीण भागाती शेतकरी सह इतर ग्राहक बाजारात मध्ये दाखल होत असून कांदा, बटाटा व लसूण, तिखट मिरची, हळद आणि कडधान्य खरेदी करतांना दिसत आहेत.
कांद्याच्या गोण्याच्या गोण्या खरेदी करतांना दिसत आहे. एकदा का पावसाळयात शेती हंगाम चालू झाल्यावर बाजारहट (खरेदी)करण्यास वेळ मिळत नसल्याने आगोटची खरेदी केली जात आहे त्याच प्रमाणे सुकी मासळी खरेदी करत असतात या केलेल्या खरेदीला अगोट संबोधत असतात.
सद्य स्थितीत उष्मां वाढत असल्याने दुपारी बाजारपेठ मध्ये सामसूम दिसुन येत असली तरी अनेक व्यवसाईक ग्रामीण भागात साहित्य घेऊन जात गावागावात विक्री करत आहेत महाड सह पोलादपूर तालुक्यात कडधान्य मोठ्या प्रमाणावर पिकवले जात असल्याने कडधान्य सुद्धा बाजारात विक्रीसाठी आले आहे बाजारपेठ मध्ये सद्यस्थितीत घरगुती साहित्य खरेदी साठी ग्राहक बाजारात येत असल्याचे पाहवयास मिळत आहे
मार्केटमध्ये घाट माथ्यावरून लसणासह कांदा उत्पादक थेट वाहनातून गावागावात विक्री करत असल्याने अनेक ग्राहक त्या उत्पादक कडून साहित्य खरेदी करत आहेत ,शहरातील ग्राहक महिन्याच्या महिन्याला लागेल तेवढं साहित्य खरेदी करत आहेत दुकानातून विविध प्रकारचे मसाले विक्री उपलब्ध असले तरी तिखट शक्यतो घरीच तयार केले जाते.
शिवाय पावसाळ्यासाठी लागणारे कडधान्य खरेदी करून ते वाळवून ठेवण्यात येते. कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर शक्यतो कीड न धरता टिकून राहाते. याशिवाय वाढत्या दरामुळे पावसाळ्यापूर्वी खरेदी सोयीस्कर ठरत आहे. बाजारातील पापड महाग पडत असल्याने पापड पीठ आणून घरात पापड करणे देखील सोयीस्कर पडत आहे.
मसाले पदार्थ दर वाडले
वाढत्या महागाईच्या काळात स्वयंपाकघराचे बजेटही दिवसेंदिवस कोलमडून जात आहे. खाद्यतेल आधीच महाग असून आता मसाल्यांच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. आखातील युद्धाचा झळ महागाईला कारणीभूत ठरत आहे 2026 मध्ये आतापर्यंत हळद, हिंग, मिरची, जायफळ, दालचिनी, वेलची, जिरे आणि धने या मसाल्यांच्या दरात तब्बल 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या मसाल्यांच्या किमती वाढल्या असून, यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे.