Thane News : पालिकेतील पोस्को गुन्ह्यातील कर्मचाऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर

कर्मचाऱ्याला पालिका आयुक्तांनी सेवेतून केले निलंबित
municipal employee POCSO case
पालिकेतील पोस्को गुन्ह्यातील कर्मचाऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर File Photo
Published on
Updated on

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेत तीन वर्षांपूर्वी अनुकंपा तत्वावर नोकरीला लागलेल्या एका स्थायी कर्मचाऱ्याने झेरॉक्स कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तो कर्मचारी अटकेच्या भितीने फरार झाला होता. अटक टाळण्यासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असून पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी मात्र या कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित केले आहे.

या कर्मचाऱ्याचे नाव सागर किणी (27) असे असून तो वडाळा, मुंबई येथे राहणारा असला तरी नोकरीच्या निमित्ताने सध्या तो भाईंदर पश्चिमेकडील गीता नगर येथे भाडेतत्वावर राहण्यास होता. तीन वर्षांपूर्वी वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर तो पालिकेत नोकरीला लागला होता आणि गेल्याच वर्षी त्याचे लग्न झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीतील कामासाठी प्रशासनाने त्याची नियुक्ती मनुष्यबळ पथकात केली होती. तर निवडणुकीच्या दैनंदिन कामासाठी पालिकेने एका झेरॉक्स मशीन चालविणाऱ्यास कंत्राट दिले होते. त्याने संबंधित झेरॉक्स मशीन पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर बसविली होती.

municipal employee POCSO case
Kalyan News : शिवसेना ठाकरे गटाचे 4 नगरसेवक अजून बेपत्ताच

मशीन चालविण्यासह झेरॉक्स काढलेले पेपर वाटपासाठी कंत्राटदाराने डिसेंबर 2025 मध्यान्हाच्या कालावधीत तीन कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले होते. त्यात अल्पवयीन पिडीत मुलीचा समावेश होता. पिडीत मुलगी कामावर असताना सागरने तिला 5 जानेवारी रोजी पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर असलेल्या भांडार विभागातून फाईल आणण्यास सांगितले. पिडीता भांडार विभागात गेल्यानंतर सागर तिच्या मागून गेला. तेथे त्याने तिचा विनयभंग केला. यानंतर 5 जानेवारी रोजी सागरने पिडीतेला निवडणुकीच्या कामाची महत्त्वाची फाईल घेण्यासाठी गीता नगर येथील घरी बोलविले. तेथे देखील त्याने तिचा विनयभंग केला.

municipal employee POCSO case
Digital payments BMC : मुंबई पालिका रुग्णालये, कार्यालये होणार कॅशलेस

याबाबत पिडीतेने तिच्या घरच्यांना माहिती दिल्यानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात सागर विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची माहिती मिळताच सागर फरार झाला होता. त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केल्याने त्याची अटक टळली असली तरी पालिकेने त्याला सेवेतून निलंबित केले आहे.

ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पालिकेने झेरॉक्स मशीन बसविण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदाराने अल्पवयीन कामगारांची नियुक्ती करणे बाल कामगार कायद्यांतर्गत गुन्हा ठरत असतानाही त्याने अल्पवयीन मुलीला कामाला ठेवले. यामुळे ठेकेदारावर बाल कामगाराची नियुक्ती केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news