Malanggad Passport Case: मलंगगड परिसरात राहणाऱ्या व्यक्तीकडे भारतीय-पाकिस्तानी पासपोर्ट; केंद्रीय चौकशीची मागणी

चांद अली अब्दुल रशीद सैयद याला हिललाईन पोलिसांकडून अटक; पाकिस्तानातील वास्तव्यापासून भारतात परतल्यानंतरच्या हालचालींच्या चौकशीची मागणी
Malanggad Passport Case
Malanggad Passport CasePudhari
Published on
Updated on

नेवाळी: कल्याण जवळील श्री मलंगगडावर राहणाऱ्या चांद अली अब्दुल रशीद सैयद याच्याकडे भारतीय आणि पाकिस्तानी पासपोर्ट आढळल्याच समोर आलं आहे. या प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशीची मागणी भूमिपुत्र धर्माभिमानी संघाने केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याबाबतचे निवेदन देखील देण्यात आलं आहे. संबंधित व्यक्तीने पाकिस्तानात वास्तव्य केलेल्या कालावधीपासून भारतात परतल्यानंतर च्या हालचालींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Malanggad Passport Case
Jogeshwari Crematorium: मोबाईलचा टॉर्च लावून अंत्यविधी आटोपण्याची रहिवाशांवर वेळ; महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त

चांद अली अब्दुल रशीद सैयद याला नुकतीच हिललाईन पोलिसांनी मलंगगड परिसरातून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने २००९ मध्ये भारतीय पासपोर्टवर पाकिस्तान गाठले होते. तेथे भारतीय नागरिकत्वाची माहिती लपवून त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी पासपोर्ट मिळवला होता.

याच पासपोर्टच्या आधारे भारतात परतल्यानंतर त्याने पुन्हा भारतीय पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या पडताळणीत चांद याने पाकिस्तानातून भारतात प्रवास केल्याचे समोर आले होते.

Malanggad Passport Case
Mumbai Memory Clinic: मुंबईत बहुविशेषज्ज्ञ ‘मेमरी क्लिनिक’

यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना मिळाले होते. हिललाईन पोलिसांनी देखील तातडीने चांद याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून मुंबई एटीएसला ही स्वतंत्र तपास करण्याची मागणी केली होती. सध्या या प्रकरणाची दोन्ही यंत्रणांकडून स्वतंत्र चौकशी सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर भूमिपुत्र धर्माभिमानी संघाने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनात संबंधित व्यक्तीच्या पाकिस्तानातील वास्तव्याची आणि तेथील संपर्कांची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

तसेच भारतीय व पाकिस्तानी पासपोर्ट मिळविण्यासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी, पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेत काही त्रुटी अथवा गैरप्रकार झाला आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे चांदची भारत आणि पाकिस्तानची वारी समोर येईल असं म्हटलं आहे. त्यामुळे आता यंत्रणांचा तपास कुठपर्यंत जातो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

चांद हॉटेलमधील शेफ !

चांद हा श्री मलंगगडावरील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच त्याचे घर देखील वन विभागाच्या जागेत असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे आता तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news