Mumbai Memory Clinic: मुंबईत बहुविशेषज्ज्ञ ‘मेमरी क्लिनिक’

डिमेन्शियाग्रस्त रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही मिळणार सर्वसमावेशक आधार
Mumbai Memory Clinic
Mumbai Memory ClinicPudhari
Published on
Updated on

मुंबई: डिमेन्शिया आणि अल्झायमरच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईत बहुविशेषज्ज्ञ पद्धतीने कार्य करणाऱ्या ‘मेमरी क्लिनिक’ची सुरुवात करण्यात आली आहे. या क्लिनिकमध्ये केवळ निदान आणि उपचार न करता रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन, पुनर्वसन आणि दीर्घकालीन मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, २०२२ पासून केईएम रुग्णालयातील मेमरी क्लिनिकच्या माध्यमातून काम करताना त्यांनी डिमेन्शियाच्या ३५७ हून अधिक रुग्णांची तपासणी केली आहे.

निदान झाल्यानंतर पुढे काय करावे, कोणाकडे उपचार घ्यावेत आणि रुग्णाची काळजी कशी घ्यावी, याबाबत अनेक कुटुंबीयांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे निदानापासून पुढील संपूर्ण प्रवासात रुग्ण आणि कुटुंबीयांना ‘हँडहोल्डिंग’ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जगभरात दर सुमारे ३.२ सेकंदाला डिमेन्शियाचा एक नवा रुग्ण आढळत असल्याचा संदर्भ देत डॉ. रावत यांनी वाढत्या आयुर्मानामुळे भविष्यात रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली. भारतातील २०२० मधील अभ्यासानुसार, ६० वर्षांवरील सुमारे ७.४ टक्के व्यक्तींमध्ये डिमेन्शिया आढळतो, असेही त्यांनी सांगितले.

Mumbai Memory Clinic
Shahapur Bus Brake Failure: ब्रेक फेल, समोर दरी अन् बसमध्ये ३० प्रवासी; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

न्यूरोलॉजिस्टपासून आहारतज्ज्ञापर्यंत तज्ज्ञांची टीम

मेमरी क्लिनिकमध्ये न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसायकॉलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, आहारतज्ज्ञ व पुनर्वसन क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली बहुविशेषज्ञ टीम कार्यरत असेल. रुग्णांच्या स्मरणशक्ती व संज्ञानात्मक क्षमतेचे सविस्तर परीक्षण, आवश्यक इमेजिंग व रक्तचाचण्यांच्या माध्यमातून डिमेन्शियाचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अल्झायमरचे लवकर निदान महत्त्वाचे

अल्झायमर हा केवळ स्मरणशक्तीशी संबंधित आजार नसून त्याचा परिणाम दैनंदिन कामे, आर्थिक व्यवहार, परिचित ठिकाणी मार्ग शोधणे आणि इतर संज्ञानात्मक क्षमतांवरही होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. अल्झायमरची सुरुवात सौम्य लक्षणांनी होते.

Mumbai Memory Clinic
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान; २७ ऑक्टोबरला मतमोजणी

त्यामुळे सुरुवातीची अवस्था दुर्लक्षित राहण्याची शक्यता असते. मात्र, लवकर निदान झाल्यास आजाराची प्रगती मंदावण्यासाठी उपलब्ध उपचारांचा उपयोग करता येतो. अल्झायमरच्या निदानासाठी रक्तचाचण्यांच्या क्षेत्रातही प्रगती झाल्याने लवकर तपासणीचे महत्त्व वाढले आहे.

कुटुंबीयांचे समुपदेशनाचाही समावेश

ग्लेनेगेल्स रुग्णालयाचे सीईओ बिपिन चेवले यांनी मेमरी क्लिनिकच्या संकल्पनेचे स्वागत केले. डिमेन्शियाचा परिणाम केवळ रुग्णावर होत नसून कुटुंबावर होतो. त्यामुळे निदानाबरोबरच उपचार, पुनर्वसन व रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांचे समुपदेशन याचा समावेश असलेली सर्वसमावेशक सेवा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

रुग्णांसोबत काळजीवाहकांचीही काळजी घेण्याचे उद्दिष्ट

डिमेन्शियामुळे वर्तनात होणारे बदल आणि आजाराबाबतची जाणीव कमी होणे यामुळे काळजीवाहकांवरही मानसिक ताण येतो. त्यामुळे रुग्णासोबतच त्यांच्या कुटुंबीयांची आणि काळजीवाहकांची काळजी घेणे हे मेमरी क्लिनिकचे महत्त्वाचे उद्दिष्ट राहणार आहे. डिमेन्शियाकडे केवळ ‘विस्मरण’ म्हणून न पाहता लवकर निदान, योग्य उपचार, पुनर्वसन आणि कुटुंबीयांना आधार देण्यावर भर दिला जाणार आहे.

सर्व डिमेन्शिया म्हणजे अल्झायमर नाही

डिमेन्शियाची काही कारणे उपचाराने सुधारू शकतात. वृद्धांमध्येही जीवनसत्त्वांची कमतरता किंवा अन्य उपचारयोग्य कारणांमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य तपासण्या करून उपचारयोग्य कारणे शोधणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. रावत यांनी नमूद केले.

तरुणांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्यामागे सततचे बहुकाम, अपुरी झोप, असंतुलित आहार आणि लक्ष केंद्रित न करणे यांसारखे घटक कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे संतुलित आहार आणि जीवनशैलीबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

निदानानंतर रुग्ण आणि कुटुंबीयांची केस कॉन्फरन्स घेऊन आजाराचे स्वरूप, पुढील उपचार आणि भविष्यातील नियोजन याबाबत स्पष्ट माहिती दिली जाणार आहे. कुटुंबात अल्झायमरचा इतिहास असल्यास भविष्यातील नियोजनासाठी योग्य माहिती आणि समुपदेशनावरही भर राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news