Madhavi Naik MLC candidature: ठाण्याला मिळाला आणखी एक आमदार; भाजपच्या निष्ठावान माजी नगरसेविका माधवी नाईक विधान परिषदेवर

दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे ठाण्यातील निष्ठावान रवींद्र फाटक या यादीवर वेटिंगवर राहिले आहेत.
Madhavi Naik MLC candidature
Madhavi Naik MLC candidaturePudhari
Published on
Updated on

ठाणे: भाजपने विधान परिषदेसाठी ठाण्याच्या निष्ठावान माजी नगरसेविका आणि फायर ब्रँड महिला नेत्या माधवी नाईक यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. उत्तर कोकणातून माधवी नाईक आणि दक्षिण कोकणातून प्रमोद जठार अशा दोघांना एकाच वेळी संधी देऊन कोकणात आपले स्थान बळकट करण्याच्या मोहिमेला बळ दिले आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे ठाण्यातील निष्ठावान रवींद्र फाटक या यादीवर वेटिंगवर राहिले आहेत.

Madhavi Naik MLC candidature
Raigad Palghar development: राज्यात 2 लाख 56 हजार कोटी गुंतवणुकीतून साकारणार 18 नवे प्रकल्प; तिसऱ्या-चौथ्या मुंबईचा विकास गतिमान

कोकणात एकूण 75 आमदार आहेत. ठाणे जिल्ह्यातील 18 आमदार आहेत. तर विधान परिषदेचे कोकणात स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक, अशा वेगवेगळ्या मतदार संघातील चार आमदार आहेत. राज्य सभेला कोकणातील विनोद तावडे यांना संधी देण्यात आली होती. आता भाजपने विधान परिषदेसाठी सहा पैकी दोन जागांवर कोकणला संधी दिली आहे.

विधान परिषदेसाठी दोन आमदार वाढल्याने महायुतीकडे आता आमदारांचे संख्याबळ 30च्या घरात गेले आहे. तर भाजपकडे ही संख्या 18पर्यंत वाढली आहे. विधान परिषदेच्या महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांची वर्णी लावली आहे. मात्र शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही.

Madhavi Naik MLC candidature
Summer Special Buses: उन्हाळी सुट्टीसाठी रायगडात 41 जादा एसटी बसेस; मामाच्या गावाचा प्रवास होणार सुखकर

कोण आहेत माधवी नाईक?

90 च्या दशकात शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा ठाण्यातील राजकारणावर मोठा दबदबा होता. 1997 साली शिवसेना आणि भाजपने युतीतून ठाणे महापालिका निवडणुका लढविल्या होत्या. श्रीनगर, वृंदावन भागातून निवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवसेनेने माजी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जे ह्या होत्या. या निवडणुकीत नाईक यांनी 16 मतांनी बिर्जे यांचा पराभव केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news