

डोळखांब : शहापुरातील डोळखांब विभागात बिबट्याची दहशत मात्र कायम आहे. परिसरातील गुंडे-डेहणे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे पाचघर - रसाळपाडा मठाजवळ दि. २ जानेवारी २०२६ रोजी रात्री रसाळपाडा येथील शेतकरी भाऊ गोडांबे यांची गाय चरत असतांना तिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने गायीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरे दिवशी सकाळी म्हणजे दि.३ रोजी वनपाल देसले व त्यांचे टीमने मृत गायीचा घटनास्थळी पंचनामा केला असुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शहापुर तालुक्यात अंदाजे पंधरा ते सोळा बिबट्यांची नोंद असुन सर्वात जास्त बिबटे डोळखांब परिसरात आढळून आले आहेत. यापैकी घाटघर जलविद्युत प्रकल्प चोंढे, तसेच आजोबा देवस्थान, बंजारा व्हील (कथोरेपाडा), बेलवली, गुंडे, वाशाळा, कोठारे, साठगाब परिसर मिळुन अंदाजे नऊ ते दहा बिबट्यांची नोंद आहे. मात्र कालांतराने परंपरागत मागनि हे बिबटे घाटमाथ्यावर भक्षाच्या शोधात स्थलांतरित होतात. तर घाटावर उसतोड झाली कि परत परंपरागत मार्गान कोकणात म्हणजे शहापुर तालुक्यात घाटघर, कसारा, मुरबाड मागनि बिबटे शहापुरात दाखल होतात. तर पुणे जुन्नर येथील रेस्क्यू कॅपमधुन काही बिबट्यांची सवय बदलुन त्यांना शहापुरात सोडल्याची देखील चर्चा आहे. परंतु तसा पुरावा स्थानिक वनविभागाकडे नाही. यामध्ये काही बिबट्यांचा देखील समावेश होतो.
यापैकी बरेचसे बिबटे हे मानवस्तीजवळ आढळून आले आहेत. कारण याठिकाणी वेगवेगळ्या शासकीय तसेच खाजगी प्रकल्पांसाठी जंगलांचे काँक्रीटीकर झाल्याने शिकारीच्या शोधत मानव वस्तीकडे वळत आहेत. अन्नसाखळीतील महत्वाचे घटक मानलेल्या बिबट्या आणी मानव यांचे मधिल संघर्ष दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे जंगल संरक्षण बरोबर हिंस्र पशु यांचे बरोबरच बिबटे आणी मानव यांचे संरक्षणाचा देखील गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. परंतु शहापुरात बिबट्यांची संख्या वाढत असताना याठिकाणी वनविभागाकडे रेस्क्यू टीम नाही. तसेच आवश्यक साहीत्य उपलब्ध नाही, हे देखील तितकेच खरे आहे.