Municipal land mapping : कुळगाव-बदलापूरचे होणार नगर भूमापन अभिलेख

5 डिसेंबरपासून सुरुवात, नक्शा प्रकल्पातंर्गत 12 गावांची निवड
Municipal land mapping
कुळगाव-बदलापूरचे होणार नगर भूमापन अभिलेखpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागामार्फत नक्शा हा पथदर्शी प्रकल्प राबिवला जात आहे. त्यामध्ये कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नगरपरिषद हद्दीतील मौजे एरंजाड, सोनिवली, कुळगाव, बदलापूर, जोवेली, वालिवली, कात्रप, शिरगाव, मांजर्ली, खरवई, माणकिवली, बेलवली या 12 गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मिळकतीचे नकाशान्वये सीमा निश्चित होऊन भविष्यातील वाद निर्माण होणार नाही, यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.

या नक्शा प्रकल्पाच्या अंतर्गत निवड करण्यात आलेल्या 12 गावामधील नगर भूमापन अभिलेख तयार करण्याकरिता चौकशी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यानुसार मिळकतीची चौकशी करणे, नवीन मिळकत पत्रिका बनविणे, मिळकतीला नवीन नगर भूमापन क्रमांक देणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.

Municipal land mapping
MSCB scam High Court notice : एमएससीबीच्या तत्कालीन संचालकांना मुक्त करण्याच्या आदेशाला आव्हान

या योजनेमुळे नागरिकांना मालकी हक्क पुरावा प्राप्त होणार असून मालमत्तेबाबत पारदर्शकता निर्माण होऊन मिळकतीचे नकाशान्वये सीमा निश्चित होऊन भविष्यातील वाद निर्माण होणार नाही. नागरी हक्काचे संरक्षण होऊन नागरिकांना कर्ज सुविधा मिळणे सुलभ होणार आहे.

या योजनेची सुरुवात 5 डिसेबर रोजी मौजे-जोवेली तालुका-अंबरनाथ जिल्हा-ठाणे येथून चौकशी कामाची सुरुवात नेमलेले चौकशी अधिकारी करणार असून नागरिकांची सजग होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चौकशी कामी हवीत ही कागदपत्रे

या प्रकल्पासाठी हक्क अभिलेख, खरेदी दस्त, भाडेपट्टा करार, बक्षीसपत्र, हक्क त्यागपत्र/ हक्कसोड, तडजोड नामा/समझोता दस्तऐवज, गहाण खत, कब्जा प्रमाणपत्र, विभाजन पत्र, मंजूर रेखांकन नकाशा, मालमत्ता कर पावती, बांधकाम परवानगी आराखडा, वसीहात नामा/मृत्यू पत्र/इच्छा पत्र, मुखत्यारपत्र, विक्री करार, वीज, पाणी, गॅस इत्यादी उपयोगिता देयके, जमीन नोंदीचे फेरफार प्रमाणपत्रे, गुंठेवारी अधिकृत केलेबाबतचे आदेशपत्र, नियमितीकरण दाखला, मंजूर नकाशे वैगरे.

Municipal land mapping
BMC authority misuse crime : मुंबई महापालिकेचे अधिकारी असल्याचे भासवत खंडणी वसुली

अडचणी असल्यास येथे संपर्क करा

या संबंधित नागरिकांना काही अडचणी असतील तसेच कागदपत्रे सादर करावयाची असल्यास अंबरनाथ तहसिल कार्यालयाच्या आवारात, अंबरनाथ बदलापूर रोड, अंबरनाथ (पश्चिम) Email id-dyslrambarnath@gmail.com . संपर्क साधण्याचे आवाहन उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news