Young Man Ends Life | बघ्यांच्या काळजात धस्... कोपर रेल्वे स्थानकात तरूणाने एक्सप्रेसखाली जीवन संपविले

मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या कोपर रेल्वे स्थानकात रविवारी दुपारी एका ३५ वर्षाच्या तरूणाने मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव एक्स्प्रेसखाली झोकून जीवन संपविले.
Young Man Ends Life
बघ्यांच्या काळजात धस्... कोपर रेल्वे स्थानकात तरूणाने एक्सप्रेसखाली जीवन संपविलेFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या कोपर रेल्वे स्थानकात रविवारी दुपारी एका ३५ वर्षाच्या तरूणाने मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव एक्स्प्रेसखाली झोकून जीवन संपविले. या तरूणाचे नाव आणि त्यांची ओळख पटलेली नाही. अचानक घडलेल्या या प्रकाराने कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या काळजात धस् झाले होते. कोपर रेल्वे स्थानकात रविवार असल्याने तुरळक गर्दी होती.

मोजकेच प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे कमांडो रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. काही प्रवासी जिन्यावरून, रेल्वे मार्ग ओलांडून ये-जा करत होते. बराच उशीर एक तरूण कोपर रेल्वे स्थानकात रेंगाळत होता. तो प्रवासी म्हणून रेंगाळत असेल असे प्रवाशांना वाटले. हा तरूण ३५ वर्षाचा होता. त्याच्या पाठीवर सॅग होती.

Young Man Ends Life
Dombivali Crime|अश्लिल फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी : अल्‍पवयीन मुलीला इन्स्‍टाग्रामवरुन केले ब्‍लॅकमेल

हा तरूण प्रवाशासारखा कोपर रेल्वे स्थानकात रेंगाळत होता. तो जीवाचे बरेवाईट करील असे कुणाही प्रवाशाला वाटले नाही. काही वेळाने हा तरूण कोपर रेल्वे स्थानकात पूर्व बाजुच्या दिशेने फलाटावरून उडी मारून रेल्वे मार्ग ओलांडून पूर्व भागातील बालाजी गार्डन संकुलाच्या दिशेने जाऊ लागला. तो पूर्व भागात जात असावा असे प्रवाशांना वाटले. पण तेवढ्यात कल्याण दिशेकडून भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेला जाणारी एक्सप्रेस आली. हे रेल्वे मार्ग ओलांडून गेलेला तरूण पाहत होता. तरीही त्याने एक्स्प्रेस जवळ येताच तिच्याखाली स्वत:ला झोकून दिले.

काही क्षणात त्याच्या चिंधड्या उडाल्या. उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांची भितीने गाळण उडाली होती. एक्स्प्रेस निघून जाताच रेल्वे स्थानकातील कमांडोने ही माहिती तात्काळ डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तरूणाला रूग्णवाहिकेतून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. तथापी त्या तरूणाला मृत घोषित करण्यात आले.

Young Man Ends Life
Kalyan Dombivali Water Cut | ड्राय डे! संपूर्ण कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा या दिवशी तब्बल सात तास बंद राहणार

  या तरूणाचे नाव, त्याचे ओळख पटविण्याचे काम लोहमार्ग पोलिसांकडून सुरू होते. सुस्थितीत असलेल्या या तरूणाजवळच्या सॅगमध्ये काही चिठ्ठी सापडते का. त्याने ही आत्महत्या का केली या दृष्टीने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेऊन तपास सुरू केला आहे.

दोन दिवसांपूर्वी डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवासी गर्दीचा धक्का लागून एका तरूणाचा रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news