Drought Talukas: ठाणे-पालघर दुष्काळाच्या यादीतून बाहेर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींची मागणी

कोकणात १२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर, रायगडला अक्षता
Drought Talukas
Drought TalukasPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: राज्यातील २६५ तालुक्यांना दुष्काळी सवलतींचा आधार मिळाला असताना ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या वाट्याला मात्र एकही दुष्काळी तालुका आलेला नाही. शासनाच्या २५ सप्टेंबरच्या निर्णयात दोन्ही जिल्ह्यांतील एकाही तालुक्यात ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आलेला नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा मिळत असताना ठाणे-पालघरमधील शेतकरी या मदतीच्या यादीबाहेरच राहिले आहेत.रायगडलाही अक्षताच लावण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा १०० टक्के तर रत्नागिरीत ३० टक्के तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालॆे आहेत.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी त्यानंतर पावसाने मोठी दडी मारली आहे. त्यातच यंदा भाताची पेरणी उशिराने झाली असून सध्या भाताचे दाणे भरण्याची अर्थात पोटरीची अवस्था सुरू आहे.

याच निर्णायक टप्प्यावर पावसाची नितांत गरज असताना पाऊस गायब झाल्याने हाताशी आलेले भातपीक धोक्यात आले आहे. पालघरमधील बहुतांश शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून बारमाही शेती किंवा नगदी पिकांचे पर्याय मर्यादित आहेत.

त्यामुळे भातपीक हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. हे पीक हातचे गेले तर शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची भीती निर्माण झाली आहे.ही प्रक्रिया दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांपुरतीच मर्यादित राहिल्यास पालघरमधील प्रत्यक्ष नुकसान शासनाच्या नजरेसमोर येणार कसे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

खरीप हंगामात जून ते आजपर्यंत पर्जन्‍यांची तूट व इतर कारणांमुळे २६५ तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ट्रिगर एक अंतर्गत रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील रत्‍नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाल्‍यामुळे या तीन्‍ही तालुक्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.

Drought Talukas
Mumbai Jan Morcha: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा

लवकरच जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने पंचनामे करून पीक परिस्‍थितीचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्‍यामुळे तीन तालुक्‍यातील भात व नाचणी उत्‍पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०२६ च्या खरीप हंगामात झालेली पावसाची अनियमितता व तूट लक्षात घेता, मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये प्रथम कळ अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या सर्वच्या सर्व ८ तालुक्यांतील बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते आज पर्यंत या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे आयुक्त, कृषी यांच्या अहवालावरून दिसून येते.

Drought Talukas
Samruddhi Expressway Expansion: विदर्भासाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्गाच्या विस्ताराला वेग; ४६ हजार कोटींचे ४ महामार्ग

पालघरला न्याय द्या

​पालघर जिल्ह्यातील शेती तुटपुंजी असून बहुतांश शेतकरी भातपिकावर अवलंबून आहेत. बाकी भागातील शेतीप्रमाणे केवळ शेतीतील ओलाव्यावर येणारे हरभरा अशीच तत्सम पिके या भागात घेण्यात येत नाही. म्हणजेच राज्यभरातील शेतकरी एक पीक गेले तर दुसरे पीक घेऊन शेती करताना दिसतात.

यापूर्वी आंबा पिकाच्या नुकसानीच्या वेळी काही भागांत प्रत्यक्ष नुकसान कमी असतानाही सरसकट नुकसान जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला होता. त्याच धर्तीवर पालघर जिल्ह्यातही तालुकानिहाय प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींच्या कक्षेत आणावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news