KDMC Mayor Bungalow Issue: केडीएमसीचा कोट्यवधींचा महापौर बंगला 16 वर्षांपासून अपूर्ण; नवनिर्वाचित महापौरांना अजूनही निवासाची प्रतीक्षा

2009 मध्ये मंजुरी, 2014 मध्ये बांधकाम पूर्ण; तरीही आजवर एकही महापौर राहिला नाही
KDMC Mayor Bungalow Issue
KDMC Mayor Bungalow IssuePudhari
Published on
Updated on

कल्याण : केडीएमसी निवडणूक संपताच आता नवनिर्वाचीत महापौरांच्या निवासस्थानासाठी उभारण्यात आलेल्या महापौर बंगल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला महापौर बंगला धूळखात पडला असल्याचे दिसून येत आहे.

KDMC Mayor Bungalow Issue
Thane drug racket: ठाण्यात 6.94 कोटींच्या हेरॉईन प्रकरणात दुसरी अटक; ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

पालिका प्रशासनाने तब्बल सोळा वर्षांपासून काम सुरू केलेल्या महापौर बंगल्याचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने महापौर बंगला धूळ खात पडला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित महापौरांना निवासस्थानासाठी महापौर बंगला मिळणार तरी कधी, यासाठी मुहूर्त पाहायची वेळ आली आहे. दरम्यान नवनिर्वाचित महापौर व शिवसेना गटनेत्यांसह पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहणी दौरा करीत प्रशासनाच्या कामचुकारपणाचा चांगलाच समाचार घेतला. मागील चार महापौरांना महापौर निवासापासून वंचित राहावे लागले असल्याने आता नवनिर्वाचित महापौरांना महापौर बंगल्याचे वेध लागले असल्याचे दिसून येत आहे .

KDMC Mayor Bungalow Issue
Bhiwandi Mayor Election: बहुमताआधीच भाजपात फूट! भिवंडीत महापौरपदावर दोन गट आमनेसामने

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांसाठी पालिका प्रशासनाने निवास स्थानासाठी 2009 साली कल्याण पश्चिमेकडील मौजे कल्याण सर्व्हे क्रमांक 42 पै. भूखंडावरील आरक्षण क्र, 39 आधारवाडी येथे पालिकेच्या महापौर निवाससाठी निवास्थान बांधण्यासाठी ठेका दिला होता. सदर बंगल्याच्या कामाचे भूमिपूजन 27 ऑगस्ट 2010 साली करण्यात आले. ठेकेदाराने महापौर निवास्थानाचे बांधकाम 2014 साली पूर्ण केले होते. यानंतर आजमितीपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला महापौर बंगला धूळ खात पडून आहे.

KDMC Mayor Bungalow Issue
Domestic Worker App: घरकामगार पुरवणाऱ्या ॲप्सचा फटका; मध्यमवयीन व ज्येष्ठ महिलांचा रोजगार धोक्यात

या महापौर बंगल्याची पाहणी महापौर हर्षाली थविल यांनी केली. महापौर बंगल्याच्या पाहणी प्रसंगी शिंदे सेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह शहर अभियंत्या अनिता परदेशी, सचिव किशोर शेळके आदी उपस्थित होते. देखभाल दुरुस्तीवर पुन्हा 60 लाखांचा खर्च महापौर बंगल्याच्या कामाला प्रत्यक्षात 2010 साली सुरुवात झाली होती. दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून उभारलेला बंगल्यात एकही महापौर राहण्यासाठी गेले नाहीत. माजी महापौर विनिता राणे या महापौर बंगल्यात राहण्यास जाणार होत्या. मात्र त्या राहण्यासाठी गेल्या नाहीत. महापौर बंगल्याच्या उभारणीवर कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यानंतर देखभाल दुरुस्तीवर पुन्हा 60 लाखांचा खर्च करण्यात आला. नुकतीच महापौर पदाची निवडणूक पार पडल्यावर महापौरांच्या निवासस्थानासाठी असलेल्या महापौर बंगल्याचा विषय चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news