Thane drug racket: ठाण्यात 6.94 कोटींच्या हेरॉईन प्रकरणात दुसरी अटक; ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

दिवा येथून जप्त 1.736 किलो हेरॉईन; कुर्ल्यातून 67 वर्षीय आरोपी अटकेत
Drug Racket
Drug RacketPudhari
Published on
Updated on

ठाणे : 23 जानेवारी रोजी पहाटे दिवा येथून 6 कोटी 94 लाख रुपये किमतीच्या 1 किलो 736 ग्रॅम हेरॉईन ड्रग्जसह एका आरोपीस ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. तलत वजाहत रसूल सय्यद (47) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव होते. दरम्यान, याच गुन्ह्यात मोहम्मद खान अहमद खान महाडिक (67) या आणखी एका आरोपीस कुर्ला येथून अटक करण्यात आली आहे.

Drug Racket
Bhiwandi Mayor Election: बहुमताआधीच भाजपात फूट! भिवंडीत महापौरपदावर दोन गट आमनेसामने

या प्रकरणात ड्रग्ज तस्करीच्या साखळीचे इंटरनॅशनल कनेक्शन उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शीळ फाट्याकडून दिव्याकडे जाणाऱ्या रोडवर एक जण हेरॉईन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना 23 जानेवारी रोजी मिळाली होती.

Drug Racket
Domestic Worker App: घरकामगार पुरवणाऱ्या ॲप्सचा फटका; मध्यमवयीन व ज्येष्ठ महिलांचा रोजगार धोक्यात

त्यानुसार पहाटे 3च्या सुमारास पोलीस पथकाने सापळा रचून एका ड्रग्ज विक्रेत्यास अटक केली होती. त्याच्याकडून 1 किलो 736 ग्रॅम वजनाचा हेरॉईनसह रोख 1 हजार रुपये तसेच 10 हजारांचा मोबाईल असा एकूण 6 कोटी 94 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news