Gutkha Spitting Action: स्मोकर्ससह पिचकारी बहाद्दरांवर फौजदारी आयुधांचा वापर व्हावा; केडीएमसीची कार्यालये तंबाखूमुक्त करण्याची मागणी

गुटखा, पान, सिगारेट सेवन करणाऱ्यांवर कारवाईची अपेक्षा
Gutkha Spitting Action
Gutkha Spitting ActionPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: पान/गुटखा खाऊन सार्वजिक ठिकाणच्या भिंती आणि कोपरे खराब करणाऱ्या पिचकारी बहाद्दरांवर यापुढे फौजदाई आयुधांचा वापर करावा, अशी मागणी पुढे आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयांमध्ये खुलेआम तंबाखू, पान, गुटखा सेवन आणि सिगारेट ओढण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक वास्तूंची स्वच्छता धोक्यात आल्याने अशा व्यक्तींना कार्यालयात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

केडीएमसीची 10 प्रभाग क्षेत्र कार्यालये, कल्याणचे आचार्य अत्रे नाट्यमंदिर, डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले कलामंदिर, कल्याणचे रूक्मिणीबाई रूग्णालय, डोंबिवलीचे शास्त्रीनगर रूग्णालय, शिक्षण मंडळ, परिवहन कार्यालय, महापालिका भवन आणि इतर विभागीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे अनेक नागरिक व काही अधिकारी आणि कर्मचारी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे

Gutkha Spitting Action
Bandra Demolition Drive: वांद्रे येथील तोडक कारवाईनंतर विस्थापित वसई-विरारकडे? माजी महापौरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

भिंती, जिने, स्वच्छतागृहे आणि कार्यालयीन परिसरात तंबाखूच्या पिचकाऱ्या मारल्या जात असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. काही ठिकाणी सिगारेट ओढण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे कर्मचारी, रूग्ण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाचा सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 लागू आहे. या कायद्यानुसार सार्वजनिक कार्यालये, रूग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सरकारी इमारतींच्या परिसरात धूम्रपानास सक्त मनाई आहे.

महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य नियमांनुसारही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, घाण करणे आणि तंबाखू सेवन करणे हा दंडनीय प्रकार आहे. तरीही महापालिकेच्या इमारतींमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची तक्रार जागरूक नागरिकांनी केली आहे. यावर तातडीने उपाय म्हणून जागरूक नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या आहेत.

तंबाखू, गुटखा खाणाऱ्या, तसेच सिगारेट सेवन करणाऱ्यांना कार्यालयात प्रवेश देऊ नये. सर्व कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तंबाखूमुक्त कार्यालय, असे फलक लावावेत. सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून विशेष नजर ठेवावी.

Gutkha Spitting Action
AC Local: एसी लोकलसेवेने प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ; चार महिन्यात दीड कोटी प्रवासी

नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने विशेष जनजागृती मोहीम राबवावी. केडीएमसीच्या सार्वजनिक इमारती स्वच्छ, सुरक्षित आणि तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केले.

शासकीय/निमशासकीय कार्यालयेही तंबाखूमुक्त व्हावीत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या व्यतिरिक तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय, कल्याण डोंबिवलीतील 8 पोलिस ठाणी, प्रांत कार्यालय, उपनिबंधक कार्यालये, केडीएमसीचे परिवहन उपक्रम कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची कल्याण-डोंबिवलीतील विभागीय कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, केडीएमसी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा, रेल्वेची कार्यालये, वाहतूक नियंत्रण शाखेची कार्यालये, आदी ठिकाणच्या सर्व कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तंबाखूमुक्त कार्यालय, असे जागोजागी फलक लावावेत, अशीही मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news