kalyan News: कल्याणमधील उच्चभ्रू परिसरात कारचालकाचे अश्लील कृत्य; महिलांसमोर भररस्त्यात केली लघुशंका

जाब विचारताच शिवीगाळ करून पळ काढला
kalyan News
kalyan NewsPudhari
Published on
Updated on

कल्याण: कल्याणमधील उच्चभ्रू वायलेनगर परिसरात एका कारचालकाने महिलांसमोर भररस्त्यात उघड्यावर लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास एक प्रवासी कार परिसरातील दुकानासमोर येऊन थांबली. त्या ठिकाणी महिला उपस्थित होत्या. चालकाने आधी जवळील दुकानातून पाण्याची बाटली घेतली आणि त्यानंतर कोणतीही पर्वा न करता कारसमोरच उघड्यावर लघुशंका करण्यास सुरुवात केली.

kalyan News
Thane News: शहापूरातील रत्नमाला इंजिनिअरिंग कॉलेज चौकशीच्या भोवऱ्यात

या घृणास्पद प्रकारामुळे परिसरातील महिला संतापल्या. दुकानातील महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी चालकाला जाब विचारला असता त्याने उलट महिलांनाच शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर तो वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.

kalyan News
Virar Alibag corridor: विरार -अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; 32 हजार कोटींच्या खर्चास मान्यता

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी राजेश लोंढे यांनी संबंधित वाहनाचा क्रमांक आणि छायाचित्र वाहतूक विभागाकडे पाठवले असून खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news