Kalyan News | कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे आरक्षण जाहीर

Kalyan Sarpanch Reservation | महिलांसाठी ५०% आरक्षण: ग्रामपंचायत निवडणुकीत नवे पर्व
Kalyan Sarpanch Reservation
सरपंच आरक्षण (File Photo)
Published on
Updated on

Kalyan Sarpanch Reservation

डोंबिवली : महसूल विभागाने कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी असलेले आरक्षण जाहीर केले आहे. उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत पध्दतीने ही आरक्षणे काढण्यात आली आहे. महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६४ च्या तरतुदीनुसार ही आरक्षणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली असून यात महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याचे तहसीलदार सचिन शेजळ यांनी सांगितले. आगामी सन २०२५ - २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी हे आरक्षण लागू राहणार असल्याचेही ते म्हणाले.

Kalyan Sarpanch Reservation
Kalyan Dombivli Municipal Transport |केडीएमटीतील महिलांचा सन्मान

लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही आरक्षणे काढताना चक्राकार पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. महिलांच्या ५० टक्के आरक्षणाचा विचार यावेळी करण्यात आला आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीत ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपून तेथे निवडणुका होतील. तेथे त्या ग्रामपंचायतीसाठी लागू असलेले सरपंच पदाचे आरक्षण लागू केले जाणार असल्याचे तहसीलदार सचिन शेजळ यांनी सांगितले. अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षणे काढताना उतरत्या क्रमाने गावांचा विचार करण्यात आला आहे.

Kalyan Sarpanch Reservation
Kalyan | कल्याणात संविधान अमृत महोत्सव संपन्न

कल्याण तालुक्यातील सरपंच आरक्षणे

आणे भिसोळ - अनुसूचित जाती (स्त्री), वासुंद्री- अनुसूचित जाती (स्त्री), कांबा - अनुसूचित जाती, जांभुळ मोहिली - अनुसूचित जमाती (स्त्री), काकडपाडा - अनुसूचित जमाती (स्त्री), वाहोली - अनुसूचित जमाती, दहिवली - नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), गोवेले रेवती - नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), निंबवली मोस - नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), उशीद, आराळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), वरप - नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), चवरे - नागरिकांचा मागास प्रवर्ग, दहागाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग, केळणी - कोलम - नागरिकांचा मागास प्रवर्ग, म्हसकळ - अनखर - नागरिकांचा मागास प्रवर्ग, वसत शेलवली - नागरिकांचा मागास प्रवर्ग, आपटी मांजर्ली - सर्वसाधारण (स्त्री), गेरसे - सर्वसाधारण स्त्री, गुरवली - सर्वसाधारण (स्त्री), घोटसई - सर्वसाधारण (स्त्री), कोसले - सर्वसाधारण (स्त्री), मामणोली - सर्वसाधारण (स्त्री), म्हारळ - सर्वसाधारण (स्त्री), नडगाव दानबाव - सर्वसाधारण (स्त्री), नांदप - सर्वसाधारण (स्त्री), राया ओझर्ली - सर्वसाधारण (स्त्री), रायते पिंपळोली - सर्वसाधारण (स्त्री), वेहळे - सर्वसाधारण (स्त्री), बापसई - सर्वसाधारण, बेहरे - सर्वसाधारण, फळेगाव - सर्वसाधारण, कुंदे - सर्वसाधारण, खोणी वडवली - सर्वसाधारण, मानिवली - सर्वसाधारण, पळसोली - सर्वसाधारण, पोई - सर्वसाधारण, रोहण अंताडे - सर्वसाधारण, सांगोडे - सर्वसाधारण, उतने चिंचवली - सर्वसाधारण, वडवली शिरढोण - सर्वसाधारण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news