कल्याण : जेलमधील कैद्यांमध्ये तंबाखू मळण्यावरून राडा

कल्याण : जेलमधील कैद्यांमध्ये तंबाखू मळण्यावरून राडा
Published on
Updated on

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला एक कैदी तंबाखू मळत असतानाच दुसऱ्या कैद्याने त्याला प्रतिबंध केला. तंबाखू मळू नकोस, माझ्या जेवणात पडेल, अशी तंबी दिली. यानंतर त्या कैदाने जाब विचारणाऱ्या कैद्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी हल्लेखोर कैद्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष साळुंके असे कैद्याचे नाव आहे. तर दानिश उर्फ मेंटल उमर इंजिनियर (वय २७) असे मारहाणीत जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी कैदी दानिश हा अंबरनाथ शहरात राहणारा असून तो एका गुन्ह्यात आधारवाडी जेलमधील बॅरेक १ च्या ५ नंबर सर्कलमध्ये शिक्षा भोगत आहे. तर त्याच बॅरेकमध्ये हल्लेखोर कैदी संतोष महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका गुन्ह्यासाठी तो २ जानेवारी २०२२ पासून आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यातच १६ मार्चरोजी रात्री साडेआठच्या सुमारास कैदी दानिश हा जेवण करत होता. तर हल्लेखोर कैदी संतोष हाताने तंबाखू मळत झटकत होता. हे पाहून मी जेवण करतोय, तंबाकू झटकू नको, अशी त्याने संतोष याला तंबी दिली. त्यामुळे कैदी संतोष भडकला. त्याने जेवणाऱ्या दानिशला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण केली.

शिवाय कैदी दानिशच्या तोंडावर जोरदार बुक्का मारून त्याचा एक दातही पाडला. कैदयांची हाणामारी पाहून जेल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कैदी दानिशला जेलमधील रुग्णालयात नेले. यात जखमी झालेल्या कैदी दानिशच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास व्ही. एस. केदार करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news