Narendra Pawar Case: कल्याणमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह दोघांवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; पडघा पोलिसांत गुन्हा

कल्याणमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्यावर विवाहित महिलेने सामूहिक अत्याचाराचा आरोप केला आहे. पडघा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Narendra Pawar Case
Narendra Pawar CasePudhari
Published on
Updated on

सापाड: माजी भाजप आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्यावर विवाहित महिलेने सामूहिक अत्याचाराचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता अत्याचाराच्या आरोपांनी कल्याणचे राजकारण तापले आहे.

या घटनेनंतर काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत दोन्ही आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली असून, पीडित महिलेला पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे.

Narendra Pawar Case
Maharashtra TET Paper Leak: महाराष्ट्र TET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; ठाणे पोलिसांकडून ३५०० पानी दोषारोपपत्र दाखल

शैलेश पाटील याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा दावा त्‍यांनी केला असून, त्यांच्या कथित गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पीडित महिलेवर दबाव आणला जाण्याची शक्यता असल्याचे सांगत तिला तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.

शैलेश पाटील यांच्या रिव्हॉल्वरच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या शस्त्राच्या जप्तीबाबत उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये आदेश दिल्याचा दावा करत, त्यानंतरही रिव्हॉल्वर जप्त करण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Narendra Pawar Case
Credit Society Loan Recovery: महाराष्ट्रातील ४६९ सहकारी पतसंस्थांवर कारवाई; १,९४९ संचालक-अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त होणार

दरम्यान, नरेंद्र पवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून, आपली बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पडघा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून दोन्ही आरोपींचा शोध घेतला जात आहे. पीडितेने दिलेले कथित व्हिडिओ व मोबाईल चॅट, तसेच अन्य उपलब्ध पुरावे तपासले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news