Mohili Village Rescue
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ सोमवारी मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आल्यामुळे एक जलथरार अनुभवास आला. येथील तिथे गुराखी जलप्रवाहात अडकल्याने एकच तारांबळ उडाली. मात्र प्रसंगावधान राखून गावातील दोन युवकांनी प्रागांची बाजी लावत या गुराख्यांचे प्राण वाचवत त्यांना सुखरूप परत आणले.
नदीचे पाणी झपाट्याने वाढल्याने पूरस्थितीत एक बेट तयार झाले असून, तीन गुराखी आपली गुरे चरवत असताना या बेटावर अडकले होते, मात्र गावातील दोन युवकांनी जीवाची बाजी लावत या गुराख्यांना वाचवले आहे.
गुराखी प्रवाहात अडकल्याची माहिती मिळताच केडीएमसीच्या अधिशमन दलाने पटनास्थळी धाव घेतली. मात्र, नदीप्रवाह वेगवान असल्याने बचावकार्यास अडथळा येत होता. या धोकादायक परिस्थितीत गावातीलच दोन युवक - गुरुनाथ पवार व रोहन पवार यांनी अतुलनीय धाडस दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून बोटीच्या सहाय्याने त्या तिघा गुराख्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या शौर्याचे गावात कौतुक होत आहे. त्यांचे हे धाडस पाहता त्यांनी परिस्थितीत गावातीलच दोन युवक - गुरुनाथ पवार व रोहन पवार यांनी अतुलनीय धाडस दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून बोटीच्या सहाय्याने त्या तिघा गुराख्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांचे हे धाडस पाहता त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाहातून गुराख्यांचे प्राण वाचवले.
दरम्यान, रायते येथील पूल वाहतुकीस बंद करण्यात आला असून, संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन वाहतूक टिटवाळामार्गे वळवण्यात आली आहे. पुलावरून अद्याप पाणी गेल्याचे वृत्त नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत अग्रिशमन दलाचे जवान घटनास्थळी तैनात केले आहेत. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बोटी पुढे जाणे अशक्य असल्याची माहिती मिळाली आहे.