Displaced Residents Kalyan
सापाड : कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा परिसरात सप्तशृंगी इमारतीचा फ्लोरिंग स्लॅब कोसळला आणि ५२ परिवारांची ताटातूट झाली. या इमारतीतील फ्लोरिंग स्लॅब कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर इमारतीतील ५२ घरांतील रहिवाशांना तेथून हलवण्यात आले आहे. दरम्यान त्यांची शाळेत तात्पुरती व्यवस्था केली आहे. मात्र त्यानंतर आमचे काय असा सवाल येथील हतबल नागरिक विचारत आहेत.
इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर प्रशासनाने या इमारतीमधील ५२ घरातील रहिवाशांना तात्काळ खाली केले. विशेष म्हणजे ही इमारत कोसळण्याच्या भीती मुले इमारती शेजारील चालीन मधील लाईट आणि पाणी प्रशासनाने बंद केल्यामुळे शेकडो रहिवाशांना आपले घर सोडावे लागले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून या इमारतीमधील संपूर्ण रहिवाशांना खाली करून त्यांची शेजारील शाळेत व्यवस्था केली आहे. मात्र ही व्यवस्था दोन दिवसाची असल्यामुळे दोन दिवसानंतर काय? असा प्रश्न सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशी आता दोन दिवसानंतर काय करायचं! कुठे जायचं! हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात घर करून उभा ठाकला आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर पालिका प्रशासनाने आमची व्यवस्था करावी अशी मागणी या सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांनी केली आहे.
आता पालिका प्रशासन या इमारतीमधील रहिवाशांची व्यवस्था काय करेल याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.