

डोंबिवली : कल्याणमध्ये एक्सपायरी डेट उलटलेल्या अर्थात मुदतबाह्य झालेल्या बियर पिल्याने एकाची तब्येत खालवल्याचा प्रकार समोर आला आहे. अजय म्हात्रे नामक व्यक्तीवर केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. कल्याणच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ज्या बिअर शॉपमधून बियर खरेदी केली त्या रियल बिअर शॉपमधील एक्सपायरी झालेल्या डेटचा साठा जप्त करण्यात आला असून पुढची कारवाई सुरू आहे.
कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा परिसरात राहणारे अजय म्हात्रे यांनी सोमवारी रात्री बिअरच्या दोन बाटल्या खरेदी केल्या. प्रेम आटो परिसरात असलेल्या रियल बिअर शॉपमधून या बाटल्या गेल्या होत्या अजय म्हात्रे घरी गेले. बियर पिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना कल्याणच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अजय म्हात्रे यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांचे काही मित्र रियल बिअर शॉपमध्ये गेले. बिअर शॉपमध्ये त्यांना काही प्रमाणात एक्सपायरी डेटच्या बाटल्या सापडल्याची माहिती अजय म्हात्रे यांच्या मित्रांनी महात्मा फुले चौक पोलिसांना दिली.
पोलिसांनी ही राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली. मंगळवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना रियल बिअर शॉपमध्ये जाऊन शॉपमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या बाटल्यांची तपासणी केली. याच दरम्यान अधिकाऱ्यांना एक्सपायरी डेट झालेल्या बिअरच्या बाटल्यांचा साठा सापडला. या विभागाने हा साठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग या प्रकरणात काय कारवाई करणार ? तर मुदतबाह्य झालेल्या बिअर पिल्यामुळे अजय म्हात्रे यांची प्रकृती खालवल्याने पोलिस या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.