

डोंबिवली : कल्याणला शुक्रवारी जुम्माची नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम बांधव मशीदीत जमा झाले. मात्र गर्दी जास्त झाल्याने मशीदीबाहेरच्या भाविकांना दुसऱ्या वेळेस नमाज पठण करा, असे सांगितले. पहिल्या वेळची नमाज संपून दुसरी नमाज सुरू होणार होती.
एका तरूणाने दुसऱ्याला सांगितले. माझ्या भावाला आत का घेतले नाही ? गेट का बंद केले ? यावरून वाद सुरू झाला. पोलिसांसमोरच हे तरुण एकमेकांशी भिडले. जोरदार राडा झाला. याचा व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाला. एकीकडे या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र दुसरीकडे वाद चिघळू नये, यासाठी पोलिसांनी समेट घडवून वादावर पडदा टाकल्याने पुढील सारे अनर्थ टळले.
कल्याण पूर्वेत आनंदवाडी परिसरात एक मोठी मशीद आहे. या मशिदीत परिसरातील मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी येतात. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक या मशीदीबाहेर राडा झाला. राड्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडियोमध्ये दोन गट आपसात हाणामारी करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन राडा सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही दोन्ही बाजूंनी वाद सुरूच होता. या संदर्भात माहिती समोर आली. शुक्रवारी जुम्म्याचा नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम बांधव जमा झाले होते. भाविकांची गर्दी जास्त झाल्यास दोन टप्प्यात नमाज अदा केली जाते. पहिल्या टप्प्यातील भाविक नमाज अदा करून बाहेर आले. त्यातील एका तरूणाने दुसऱ्याला जाब विचारला. माझ्या भावाला आत का घेतले नाही. गेट का बंद केले. या किरकोळ कारणावरून वादंग निर्माण झाला. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज खान आणि दस्तगीर खान या दोघांमध्ये वाद झाला. दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दिली आहे. दोघांना वैद्यकीय चाचणीकरिता सरकारी रुग्णालयात पाठविले आहे. दोघांच्या विरोधात कायदेशीर करावाई केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.