Kalyan Pan Shop Worker Attack: कल्याण-मलंगगड रोडवर पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला; चौघे हल्लेखोर फरार

कल्याण-मलंगगड रोडवर पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला; चौघे हल्लेखोर फरार
Kalyan Pan Shop Worker Attack
Kalyan Pan Shop Worker AttackPudhari
Published on: 
Updated on: 

डोंबिवली: कल्याण-मलंगगड रोड परिसरात जुन्या वादाच्या रागातून पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस फरार हल्लेखोर चौकडीचा शोध घेत आहेत.

मुकेश रामप्रसाद जयस्वाल (३५) हे शंभर फूट रोड परिसरातील एका पान शॉपमध्ये काम करतात. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास तित्या उर्फ राहुल (वय अंदाजे २५) याने पान शॉपवर येऊन सिगारेट मागितली.

मुकेश याने सिगारेट नसल्याचे सांगितल्यावर त्याने शिवीगाळ-दमदाटी करत चॉकलेट-बिस्किटांच्या बरण्या फोडल्या व हातातील चापटीने मारहाण केली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद होता.

त्यानंतर गुरूवारी सकाळी एका रिक्षा चालकाने येऊन आधीच्या भांडणाचा उल्लेख करत वाद वाढवण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

Kalyan Pan Shop Worker Attack
Digital Arrest Scam: सायबर सुरक्षेसाठी सावधानता हाच एकमेव उपाय; वाढत्या सायबर क्राईमला रोखण्यासाठी पोलिसांचा सल्ला

दरम्यान, शुक्रवारी रात्री पान शॉप बंद करून मुकेश जयस्वाल हे त्यांचा मित्र अजय हिरालाल प्रसाद (२७) याच्यासोबत दुचाकीहून घरी जात होते. इतक्यात पाठीमागून आलेल्या रिक्षाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. रिक्षातून तित्या उर्फ राहुल, त्याचा भाऊ आणि इतर दोन अनोळखी खाली उतरले.

जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. त्यातील एकाने मित्र अजय याच्या उजव्या हाताच्या बोटांवर व मनगटावर लाकडी काठीने मारहाण केल्याने अजय तिथून पळून गेला.

Kalyan Pan Shop Worker Attack
Koyna Dam Water: मुंबईला कोयनेचे पाणी देण्यापूर्वी कोकणाची तहान भागवा; सुनील तटकरेंची मागणी

यानंतर चौघांनी मुकेश यांना घेरून शिवीगाळ केली. तित्या उर्फ राहुल याने चाकूसारख्या दिसणाऱ्या हत्याराने मुकेश यांच्या डोक्यात वार केले, तर राहुलच्या भावाने लोखंडी रॉडने आणि दोन अनोळखी मित्रांनी लाकडी काठीने पाठ, छाती आणि उजव्या हातावर मारहाण करून गंभीर दुखापत केली.

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या झटापटीत मुकेश यांच्या गळ्यातील चेन व पैसे पडून गहाळ झाले आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडले. या घटनेनंतर मित्र अजय प्रसाद व अनिकेत खाडे यांनी मुकेश यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर शुक्रवारी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात फिर्यादीचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.