Koyna Dam Water: मुंबईला कोयनेचे पाणी देण्यापूर्वी कोकणाची तहान भागवा; सुनील तटकरेंची मागणी

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे; मुंबईला पाणी देताना कोकणाकडे दुर्लक्ष नको, अशी भूमिका.
Sunil Tatkare
Sunil TatkarePudhari
Published on: 
Updated on: 

अरुण पवार

माणगाव: मुंबईची तहान भागविण्यासाठी कोयना धरणातील पाणी मुंबईकडे वळविण्याचा निर्णय होत असताना कोकणातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये.

मुंबईला पाणी देण्यापूर्वी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांची पाण्याची गरज प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी, अशी ठाम मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. मुंबईची तहान भागली पाहिजे; पण त्यासाठी कोकणातील जनतेच्या घशाला कोरड पडता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Sunil Tatkare
Panvel water shortage: मोरबे धरणातील पाणी पनवेल शहराला द्या; महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांची मागणी

यंदा पाऊस कमी झाल्याने कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते.

त्यामुळे भविष्यातील गरजांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. जलसंपदामंत्री असताना आपण याबाबत शासनस्तरावर परिपत्रकाद्वारे आवश्यक तरतूद करून ठेवली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. माणगाव येथे नर्सिंग कॉलेजच्या भूमिपूजन समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई ही आर्थिक राजधानी असली तरी कोकणातील जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाणीवाटपाचा आराखडा तयार करताना कोकणातील लोकसंख्या, शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची गरज यांचा एकत्रित विचार होऊन कोकणच्या हक्काचे पाणी सुरक्षित राहावे, असा आग्रह तटकरे यांनी धरला.

Sunil Tatkare
Matheran News: माथेरानमध्ये ७४ हातरिक्षाचालक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत; ई-रिक्षा व्यवस्थेमुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर

माणगावमधील काळ आणि गोद नद्यांची पातळी खालावली असून काळ नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. भविष्यकालीन पाणीटंचाई लक्षात घेता काळ नदीवर बंधारा बांधणे अत्यंत आवश्यक आहे.

या कामाला लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे आश्वासन तटकरे यांनी दिले. या बंधाऱ्याचा लाभ माणगावसह आसपासच्या अनेक गावांना होणार असून, मुंबई आणि कोकण या दोन्हींच्या पाण्याचा समतोल राखणारे धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या कामाला लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे आश्वासन तटकरे यांनी दिले. या बंधाऱ्याचा लाभ माणगावसह आसपासच्या अनेक गावांना होणार असून, मुंबई आणि कोकण या दोन्हींच्या पाण्याचा समतोल राखणारे धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.