Kalyan fire : कल्याणमधील भीषण आगीत टपऱ्या जळून खाक; दुकानदारांचे आर्थिक नुकसान

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
Kalyan fire
कल्याणमधील भीषण आगीत टपऱ्या जळून खाक; दुकानदारांचे आर्थिक नुकसानpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या चिंचपाडा रोडवरील मॉडेल कॉलेज परिसरात मंगळवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत टपऱ्या जळून खाक झाल्या.

रस्त्यालगत असलेल्या भाजी आणि माठ विक्रीसाठी उभारलेल्या टपऱ्यांनी अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Kalyan fire
Palghar road accident : डहाणूतील सारणी खिंडीत टेंपोची झाडाला धडक

चिंचपाडा रोडवर मॉडेल कॉलेजच्या अगदी जवळ रस्त्याच्या कडेला काही कच्च्या स्वरूपाच्या टपऱ्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिकन व भाजी विक्रेत्यांसह इतर छोट्या व्यावसायिकांची दुकाने होती. अचानक एका टपरीतून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की लांबूनही धुराचे लोट दिसत होते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरत होती. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्यापासून रोखली. या आगीत भाजी, मातीची भांडी, रांजण विक्रीसाठी उभारलेल्या टपऱ्या जळून खाक झाल्या.

Kalyan fire
KDMC demolition Balyani : बल्याणीतील 29 अनधिकृत चाळी जमीनदोस्त

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त वर्तविण्यात येत आहे. भरवस्तीत व मुख्य रस्त्यावर ही घटना घडल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news