Palghar road accident : डहाणूतील सारणी खिंडीत टेंपोची झाडाला धडक

सुदैवाने जीवितहानी टळली, अपूर्ण रस्तेकामामुळे अपघात सत्र
Palghar road accident
डहाणूतील सारणी खिंडीत टेंपोची झाडाला धडकpudhari photo
Published on
Updated on

डहाणू : डहाणू-चारोटी मार्गावरील सारणी खिंडीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास भरधाव आयशर टेंपो झाडाला धडकून अपघात झाला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आयशर टेंपो नाशिकच्या दिशेने जात होता. पहाटेच्या सुमारास अचानक समोरून एक कार आल्याने चालकाने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र टेंपोत तांदळाचा कोंडा भरलेला असल्यामुळे वाहन अवजड झाले होते. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून टेंपो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळला. या अपघातात टेंपोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र चालकासह इतर कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Palghar road accident
Vikramgad Deherje project : शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत देहर्जे प्रकल्पाचे काम थांबवावे

दरम्यान, डहाणू-चारोटी मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी वधना ब्रिजवरून स्कॉर्पिओ गाडी खाली कोसळून गंभीर अपघात झाला होता. त्या ठिकाणी संरक्षणासाठी दुतर्फा पाईप बसवण्यात आले असले तरी ते सध्या बाहेर निघालेल्या अवस्थेत असल्याने पुन्हा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याचे काम सुरू करून ते अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे.

Palghar road accident
KDMC demolition Balyani : बल्याणीतील 29 अनधिकृत चाळी जमीनदोस्त

तर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाची संपर्क साधून विचारणा केली असता हा रस्ता आमच्याच अखत्यारीत आहे. परंतु त्यावरील सर्वच कामे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा ने केली आहेत. त्यांनी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविल्यामुळे मागील काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांनीच या रस्त्यावर कामे केलेली आहेत. सध्या तरी आमचा या मार्गाशी अर्थात काहीही संबंध नाही.

इरफान खान पठाण कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मोखाडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news