Kalyan Hookah Parlour Raid : कल्याणमधील दम मारोंचा दम रोखला

हुक्का पार्लरच्या मालकासह २० जणांवर गुन्हा दाखल
Kalyan Hookah Parlour Raid
Kalyan Hookah Parlour Raidpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या साईचौक परिसरातील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर खडकपाडा पोलिसांनी अचानक धाड टाकली. पोलिसांनी केलेल्या या कठोर कारवाईत पार्लर वजा अड्ड्याच्या मालकासह व्यवस्थापक, कर्मचारी आणि ग्राहक अशा एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ३६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

या संदर्भात खडकपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्बिट कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या चौथ्या मजल्यावर द व्हिंटेज स्काय लाँज या नावाने हुक्का पार्लर सुरू होता. शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास पोलिसांनी या कथित पार्लरवर छापा टाकला.

Kalyan Hookah Parlour Raid
Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंगमध्ये सायबर पोलिसांकडे शंभराहून अधिक तक्रारी

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी असतानाही या अड्ड्यावरील ग्राहकांच्या टेबलावर तंबाखूजन्य आणि ज्वालाग्राही हुक्का पुरवून मानवी जीवितास धोका निर्माण केला जात होता. या प्रकरणात हुक्क्याचा मालक अजीम कांबळे (२९), हॉटेल चालक हुसेन हेमंत कल्याणवाला (३०), कॅशियर साहिल दीपक आसरानी (२८), हुक्का मेकर रवि मनोज दास (२४) आणि इतर चार वेटरनी संगनमताने हा गोरखधंदा चालविल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान स्पष्ट झाले. या अड्ड्यावर १२ ग्राहक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळून आले.

याप्रकरणी मालक अजीम कांबळे, हेमंत कल्याणवाला, साहिल आसरानी, रवी दास यांच्यासह हंजला, अकबाल, अफ्तार, इरफान, हितेश , आसीर, अजलाम, उमर, नबील, सूरज, अक्षय आणि अल्पेश आदींसह २० जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Kalyan Hookah Parlour Raid
BEST Solar Energy Project : मुंबईत सौर ऊर्जा निर्मिती अशक्य !

सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८७, १२५, ३ (५), तसेच सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ आणि सुधारणा अधिनियम २०१८ च्या कलम ४ (अ) व २१ (अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.