Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंगमध्ये सायबर पोलिसांकडे शंभराहून अधिक तक्रारी

ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये २४ टक्क्यांनी वाढ; गेल्या वर्षभरात दोनशेहून अधिक तक्रारी
Online Shopping Fraud
Online FraudPudhari News Network
Published on: 
Updated on: 

ठाणे : नवरात्र, दसरा, दिवाळी, ईद आदी सण एकापाठोपाठ आल्याने ऑनलाइन शॉपिंगकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. मात्र, ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा उचलून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बनावट ई कॉमर्स कंपन्यांचा देखील सर्वत्र सुळसुळाट या सणासुदीच्या काळात वाढलेला दिसून आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध बनावट उत्पादनांची जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टेलीशॉपिंग कंपन्यांच्या विरोधात गेल्या दोन राज्य सायबर पोलिसांकडे शंभराहून अधिक तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.

सणांचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय.घराघरात सणांची जोरदार तयारी सुरू असतांना अनेकांनी ऑनलाइन खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले. इ कॉमर्स कंपन्यांनी देखील सणाच्या काळात अनेक ऑफर्स व ऑनलाइन सेल जाहीर केल्या होत्या. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून आले.

Online Shopping Fraud
Panvel Karjat Railway Line : पनवेल -कर्जत रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात

ईवाय-आयव्हीसिए ट्रेंड बुकच्या रिपोर्टनुसार २०२६ या वर्षात ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये २४ टक्क्यांनी वाढ होणार आहे. दरम्यान, प्रचंड झपाट्याने वाढत असलेल्या ऑनलाईन शॉपिंगचे फॅड ओळखून अनेक सायबर गुन्हेगारांनी या मार्केटवर आपली नजर रोवली आहे. ऑनलाइन शॉपिंगकडे ग्राहकांचा वाढता कल ओळखून अनेक सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा बाजार उभा केलाय. या सायबर ठगांनी काही बनावट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उ‌द्याला आणले असून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे.

सोशल मीडिया मार्केटिंगचा वापर करून अशा वेबसाईट्स नागरिकांना गंडा घालत आहेत. ऑनलाइन पेमेंट स्वीकारून वस्तू ग्राहकांना न पाठवणे, नकली वस्तू पाठवणे, आकर्षक ऑफर्सचे आमिष दाखवून ऑनलाइन पेमेंट वळते करणे अशा अनेक फसवणुकीच्या पद्धती या सायबर गुन्हेगारांनी शोधून काढल्या आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय नोकरदार महिलेने ऑनलाईन पेमेंट करून खरेदी केली. मात्र, त्यांना ऑर्डरची डिलिव्हरीच मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली.

Online Shopping Fraud
Mumbai Crime : तरुणांना जाब विचारला अन् दगडाने हल्ला; उपचारादरम्यान ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

ठाण्यात गेल्या वर्षभरात ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीच्या दोनशेहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध बनावट उत्पादनांची जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टेलीशॉपिंग कंपन्यांच्या विरोधात गेल्या वर्षी राज्य सायबर पोलिसांकडे हजाराहून अधिक तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.

सतर्कता बाळगा फसवणूक टाळा

ऑनलाइन शॉपिंग करताना फसवेगिरी टाळण्यासाठी योग्य माहिती मिळवणे आणि सावधानता बाळगणे हे फार महत्वाचे ठरते. इंटरनेट कनेक्शन सेक्युअर आहे का ते पाहणे, वस्तूंच्या किमतीची खातरजमा करून घेणे, नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करतांना सावधानता बाळगणे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवीन वेबसाईटवरून खरेदी करत असल्यास ती वेबसाईट तपासणे फार गरजेचे आहे. वेबसाईटचे रैंकिंग आणि पुनरावलोकन तपासणे देखील फसवणूक टाळू शकते असे सायबर तज्ञ सल्ला देतात.