

मुंबई : बेस्ट उपक्रमाने उत्पन्न वाढीसाठी सौर ऊर्जा निर्मिती करण्याची मागणी पालिका सभागृहाणी केली होती. परंतु मुंबई टोलेजंग इमारती असल्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध होत नसल्याचे सांगत, बेस्टने सौर ऊर्जा निर्मिती अशक्य असल्याचे स्पष्ट करत सभागृहाची मागणी फेटाळली आहे.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली असून मुंबई महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानातून बस खरेदी करण्यासह कर्मचाऱ्यांची दिली जात आहेत. २०२६-२७ या आर्थिक वर्षात बेस्टच्या परिवहन विभागाची तूट ३,९५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बेस्टने उत्पन्न वाढीसाठी महापालिका सभागृहाने काही सूचना केल्या होत्या. यात सौर ऊर्जा निर्मितीबाबत बेस्ट प्रशासनाने चाचपणी करावी, अशी मागणी केली होती. यावर बेस्ट प्रशासनाने अभिप्राय दिला आहे. मुंबई शहर हद्दीमध्ये टोलेजंग इमारती असल्यामुळे पुरेसा सुर्य प्रकाश उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे शहरात मोकळे भूखंड उपलब्ध नसल्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान २०२५-२६ या आर्थिक वर्षात स्वच्छ ऊर्जेच्या निकषानुसार बेस्टने ३२.३८ दशलक्ष युनिट पवन ऊर्जा आणि ६२९.८ दशलक्ष युनिट सौर ऊर्जा खरेदी केली असल्याचे अभिप्रायमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३८४३ नवीन वाणिज्य वीज जोडण्या करण्यात आल्या. यातून ३५ मेगावॅट वीजभार देण्याची कार्यवाही करण्यात आल्याचेही बेस्ट कडून सांगण्यात आले.