

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप शिंदे सेनेची महायुती आहे. महापालिकेच्या १० प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी एकूण १८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहे.
त्यापैकी चार प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने त्याठिकाणची सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा २१ ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे.
अ प्रभाग समिती सभापती पदासाठी शिंदे सेनेचे बंदेश जाधव, जे प्रभाग समितीसाठी सभापती पदासाठी शिंदे सेनेच्या दर्शना काळे, ड प्रभाग समिती सभापती पदासाठी मनसेच्या शितल मंढारी आणि फ प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपच्या मंदा पाटील यांनी अर्ज भरला आहे.
या चारही प्रभागात प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने या ठिकाणी सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा २१ ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे.
मात्र ब प्रभाग समितीसाठी शिंदे सेनेच्या सुप्रिया भोईर, उद्धव सेनेच्या स्वप्नाली केणे, ग प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपच्या कविता म्हात्रे, शिंदे सेनेचे सूरज मराठे, आय प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपच्या सरोज राय, उद्धव सेनेचे नीलेश खंबायत, ई प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपच्या रविना माळी, शिंदे सेनेचे अर्जुन पाटील, क प्रभाग समिती सभापती पदासाठी मेघाली खेमा, शिंदे सेनेचे प्रतिक पेणकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रमीज मणियार, ह प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपच्या रविना म्हात्रे, मनसेचे संदेश पाटील, शिंदे सेनेच्या रेखा म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
अर्ज भरते वेळी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आदी उपस्थित होते