Janani Devi Mahad: महाडमधील जननीदेवीचे महत्त्व काय? कोलगावच्या सात वाड्यांची श्रद्धा आणि परंपरा जाणून घ्या

कोलगावच्या सात वाड्यांची ग्रामदेवता; शतकानुशतके श्रद्धेची परंपरा कायम; मंदिराला सुंदर कोरीव कळस
Janani Devi Mahad
Janani Devi MahadPudhari
Published on: 
Updated on: 

प्रसाद पाटील

वरंध: महाड तालुक्यातील शहरालगत असलेल्या कोलगावची ग्रामदेवता आई जननी देवी असून, नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ओळख संपूर्ण पंचक्रोशीत आहे. कोलगावातील सातही वाड्यांचे श्रद्धास्थान असलेल्या जननी देवीच्या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते.

शतकानुशतके चालत आलेली भक्तीची परंपरा आजही ग्रामस्थांनी जपली असून, देवीचे विविध धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.

Janani Devi Mahad
ST Bank Inquiry: एसटी बँकेत लाखो रुपयांची अनियमितता; चौकशीसाठी सात अधिकाऱ्यांची नियुक्ती

आई जननी देवीच्या स्थापनेविषयी ग्रामस्थांमध्ये एक आख्यायिका प्रचलित आहे. पृथ्वीवर अराजकता माजली असताना देवीने मंदिराशेजारी असलेल्या शंकराच्या पिंडीची पूजा केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी शंकराच्या पिंडीच्या बाजूला जननी देवीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून जननी देवी ही कोलगावातील सातही वाड्यांची ग्रामदेवता म्हणून पूजली जाते.

ग्रामस्थांची देवीवर असलेली अढळ श्रद्धा आजही कायम असून, प्रत्येक सण-उत्सवात देवीच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. कोलगावातील जननी देवीच्या उपासनेला परंपरेची जोड लाभली आहे. देवीचा साज गावातील पाटील कुटुंबाच्या घरी ठेवला जातो.

सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी हा साज वाजतगाजत मंदिरात आणून देवीला घालण्याची परंपरा आजही जपली जाते. दरवर्षी २३ एप्रिल रोजी मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी साकडे घालतात.

Janani Devi Mahad
Kalamboli Saptashrungi Mata Temple: कळंबोलीत सप्तशृंगी मातेचा जागर, खान्देशवाशियांची मांदियाळी

कोकणातील ग्रामीण जीवनात शेती आणि धार्मिक परंपरांना विशेष महत्त्व आहे. भातशेतीची लावणी आधी कोई कोई साजरा करण्याची प्रथा आजही अनेक गावांमध्ये जपली जाते. कोलगावातही या परंपरेला विशेष महत्त्व असून, गावावर येणारी संकटे, रोगराई आणि अन्य अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी ग्रामस्थ देवीला नैवेद्य दाखवून गावाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

ग्रामस्थांचे श्रद्धास्थान

दरवर्षी दसरा, शिमगा, कोई कोई, पावता आणि वर्धापन दिन असे विविध उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सोहळ्यांना कोलगावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचीही मोठी उपस्थिती लाभते. श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि ग्रामएकतेचा वारसा जपणारी आई जननी देवी आजही कोलगावच्या ग्रामस्थांच्या जीवनातील महत्त्वाचे श्रद्धास्थान बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news