KDMC sonography scam: केडीएमसीच्या नावाखाली सोनोग्राफीच्या दरांची लूट?

ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांकडून तब्बल 2400 रुपये आकारणी
sonography scam
sonography scamPudhari
Published on
Updated on

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या टिटवाळ्यातील प्रसूतीगृहात आउटसोर्सिंग पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या खासगी सोनोग्राफी केंद्राकडून गर्भवती महिलांकडून ठरलेल्या दरापेक्षा दुप्पट-तिप्पट शुल्क आकारून आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. या प्रकरणावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपच्या स्थानिक नगरसेविका व स्थायी समिती सदस्या भोईर यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले.

sonography scam
Dombivali Crime: अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; एमएफसी पोलिसांनी ठोकल्या कराटे प्रशिक्षकाला बेड्या

टिटवाळ्यातील पालिकेच्या प्रसूतीगृहात खासगी कंत्राटदारामार्फत चालविण्यात येणाऱ्या सोनोग्राफी केंद्रात स्थानिक महिलांकडून 400 रुपयांऐवजी 800 ते 900 रुपये, तर ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांकडून तब्बल 2400 रुपये आकारले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

नगरसेविका भोईर यांनी सांगितले की, शासनाच्या नियमानुसार गर्भवती महिलेच्या पहिल्या दोन सोनोग्राफी मोफत असणे अपेक्षित आहे. त्यानंतरच्या तपासणीसाठी केवळ 400 रुपये आकारले जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात महिलांकडून जादा पैसे उकळले जात आहेत.

“बाहेरील रुग्णांकडून दुप्पट-तिप्पट दर आकारण्याची परवानगी करारात आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपचे नगरसेवक मंदार हळबे यांनीही प्रशासनावर निशाणा साधत, “केडीएमसीचे लेबल वापरून खासगी कंत्राटदार स्वतःचा खिसा भरत असून सर्वसामान्य गर्भवती महिलांची आर्थिक पिळवणूक होत आहे,” असे सांगत चौकशीची मागणी केली.

sonography scam
Thane illegal schools: ठाण्यातील 58 बेकायदा शाळांची यादी महापालिकेकडून जाहीर, कळवा-मुंब्र्यात अधिक शाळा

सभापती मल्लेश शेट्टी यांनी हा आरोप गंभीर असल्याचे नमूद करत प्रशासनाला या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संबंधित विषय स्थगित ठेवण्यात आला. या प्रकरणी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी, “संपूर्ण माहिती घेऊन पुढील सभेत अहवाल सादर करू. कंत्राटदाराकडून जादा शुल्क आकारले जात असल्यास ती गंभीर बाब आहे,” असे सांगितले.

प्रस्तावालाच आक्षेप

टिटवाळ्यातील रुक्मिणी प्लाझा येथील प्रसूतीगृहात वेस्टर्न हेल्थ कन्सल्टन्सी या कंपनीला मनुष्यबळ पुरविणे, प्रयोगशाळा तपासण्या करणे आणि सोनोग्राफी सेवा देण्यासाठी प्रतिदिन 3 हजार रुपये दराने तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. मात्र, दरवाढीच्या आरोपांमुळे या प्रस्तावालाच आक्षेप घेण्यात आला. येईल असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news