Thane illegal schools: ठाण्यातील 58 बेकायदा शाळांची यादी महापालिकेकडून जाहीर, कळवा-मुंब्र्यात अधिक शाळा

तब्बल 58 अनधिकृत शाळांची यादीच आज ठाणे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा जाहीर केली आहे.
School
SchoolPudhari
Published on
Updated on

ठाणे: शहरात बेकायदा शाळा फोफावल्या असून यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या बेकायदा शाळा बंद करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तब्बल 58 अनधिकृत शाळांची यादीच आज ठाणे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा जाहीर केली आहे.

दरम्यान, जिल्यात सर्वात जास्त बेकायदा शाळा या कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात असल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात बेकायदा शाळांचा सुळसुळाट झाला आहे. काही शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून नोटीसा बजावण्यात आल्यानंतरही मुजोर संचालकांनी शाळा बंद केल्या नाहीत.

School
Vasai Virar power demand: वसई-विरारमध्ये विजेच्या मागणीत मोठी वाढ; उष्णतेमुळे वीज वापर विक्रमी पातळीवर

बेकायदा शाळांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाने पथकांची स्थापना केली होती. मात्र, बेकायदा शाळा बंद करण्यात प्रशासनाला अपयश आल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतल्यास व त्यातून शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांची राहील, याची नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच शहरातील बेकायदा शाळेमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नये असे आवाहन देखील ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

School
Vasai Virar tax hike: वसई-विरार मनपाचा लाभकराच्या माध्यमातून करवाढीचा प्रयत्न; भाजप आक्रमक

सर्वाधिक शाळा कळवा, मुंब्रा, दिव्यात

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास आता अवघा महिना उरला आहे. बेकायदा शाळांमध्ये प्रवेशघेऊ नये म्हणून शिक्षण विभागाने बेकायदा शाळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कळवा, मुंब्रा, दिवा या भागात अशा शाळा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषत: झोपडपट्टी असलेल्या भागात बेकायदा शाळा उभारून पैसे लुटण्याचे प्रकार होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news