Kalyan News : डॉक्टर असुरक्षितच! कल्याणातील हिंसक हल्ल्यानंतर 'आयएमए' आक्रमक; कठोर कारवाईची माग

‘दहशतीच्या वातावरणात रुग्णसेवा अशक्य’
Kalyan News
कल्याणातील भानुज्योत रुग्णालयात शनिवारी रात्री डॉ. योगेंद्र जैस्वाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याणातील भानुज्योत रुग्णालयात शनिवारी रात्री डॉ. योगेंद्र जैस्वाल यांच्यावर झालेल्या हिंसक हल्ल्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) ज्येष्ठ नेते डॉ. मंगेश पाटे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, "रुग्णालयातच डॉक्टरांवर हल्ले होणे अत्यंत गंभीर, निषेधार्ह आणि आरोग्य व्यवस्थेला काळिमा फासणारे आहे," अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

दहशतीच्या वातावरणात आरोग्यसेवा अशक्य

डॉ. पाटे म्हणाले की, "धमक्या, दबाव किंवा भीतीच्या वातावरणात सुरक्षित व परिणामकारक आरोग्यसेवा देणे कदापि शक्य नाही. रुग्णसेवा ही परस्पर विश्वासावर आधारलेली असते; मात्र अशा घटनांमुळे त्या विश्वासाला तडा जातो. उपचाराबाबत तक्रार, गैरसमज किंवा आक्षेप असल्यास रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय मंडळ किंवा कायदेशीर मार्गाने दाद मागता येते. परंतु मारहाण, शिवीगाळ करणे किंवा दहशत निर्माण करणे हा कोणत्याही परिस्थितीत पर्याय असू शकत नाही."

Kalyan News
Kalyan Doctor Assault: डॉक्टरला मारहाणप्रकरणी अखेर फौजदारी कारवाई;कोळसेवाडी पोलिसांकडून चौकशी सुरू, कल्याण पूर्वेतील घटना

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

डॉक्टर रुग्णाची तपासणी करत असतानाच त्यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एका डॉक्टरपुरता मर्यादित नसून, अहोरात्र सेवा देणाऱ्या संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. डॉक्टरांना निर्भयपणे वैद्यकीय निर्णय घेता यावेत आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सुरक्षित कार्यपरिसर असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Kalyan News
Kalyan Dombivli Hospital Doctors Transfer: केडीएमसी रुग्णालयातील नऊ डॉक्टरांच्या बदल्या

दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

"वैद्यकीय सेवेत कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला थारा नाही," असा इशारा देत डॉ. मंगेश पाटे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी, असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news