Kalyan Doctor Assault : डॉक्टरांना मारहाण करणारा विनीत देशमुख मोकाट, ७२ तास उलटले तरी आरोपी फरार

भानुज्योत रुग्णालयात डॉ. योगेंद्र जैस्वाल यांच्यावर हल्ला करणारा विनीत जयवंत देशमुख हा घटनेच्या तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
भानुज्योत रुग्णालयात डॉ. योगेंद्र जैस्वाल यांच्यावर हल्ला करणारा विनीत जयवंत देशमुख हा घटनेच्या तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील पुना लिंक रोडवरील भानुज्योत रुग्णालयात डॉ. योगेंद्र जैस्वाल यांच्यावर हिंसक हल्ला करणारा आरोपी विनीत जयवंत देशमुख (वय ३०) हा घटनेच्या तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली आहे. मात्र, घटनेला तीन दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाट असल्याने वैद्यकीय संघटनांनी कोळसेवाडी पोलिसांच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नेमकी घटना काय?

शनिवारी (२२ ऑगस्ट) रात्री पावणे अकराच्या सुमारास जयवंत देशमुख हे मुलगा विनीतसह उपचारासाठी भानुज्योत रुग्णालयात आले होते. डॉ. योगेंद्र जैस्वाल यांनी जयवंत यांची तपासणी करून औषधांची माहिती दिली. तरीही विनीतने डॉक्टरांचा एकेरी उल्लेख करत पथ्य व गोळ्यांबाबत पुन्हा आक्रमकपणे विचारणा सुरू केली. डॉक्टरांनी त्याला केबिनबाहेर जाण्यास सांगितल्यावर चिडलेल्या विनीतने प्रथम डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर केबिनबाहेर जाऊन पुन्हा अचानक आत घुसत डॉ. जैस्वाल यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. उपस्थित इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी मध्यस्थी केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

भानुज्योत रुग्णालयात डॉ. योगेंद्र जैस्वाल यांच्यावर हल्ला करणारा विनीत जयवंत देशमुख हा घटनेच्या तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
Kalyan Doctor Assault: डॉक्टरला मारहाणप्रकरणी अखेर फौजदारी कारवाई;कोळसेवाडी पोलिसांकडून चौकशी सुरू, कल्याण पूर्वेतील घटना

तक्रार नोंदवताना पोलिसांची अर्धा तास टोलवाटोलवी

हल्ल्यानंतर डॉ. जैस्वाल तत्काळ तक्रार देण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने "तुम्हाला फक्त मारहाण झाली आहे, त्यामुळे हा केवळ अदखलपात्र (NC) गुन्हा ठरतो," असे सांगत तब्बल अर्धा तास तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप डॉ. जैस्वाल यांनी केला आहे. आपण कर्तव्यावर असताना हा हल्ला झाल्याचे सांगूनही पोलीस दुर्लक्ष करत होते. अखेर विविध वैद्यकीय संघटनांनी पोलीस ठाण्यात दबाव आणल्यानंतरच या प्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. टाळाटाळ करणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यावरही कडक कारवाई करावी, अशी मागणी खासगी डॉक्टरांनी केली आहे.

भानुज्योत रुग्णालयात डॉ. योगेंद्र जैस्वाल यांच्यावर हल्ला करणारा विनीत जयवंत देशमुख हा घटनेच्या तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
Kalyan News : डॉक्टर असुरक्षितच! कल्याणातील हिंसक हल्ल्यानंतर 'आयएमए' आक्रमक; कठोर कारवाईची माग

हल्लेखोरांचे मनोधैर्य वाढण्यास पोलीसच कारणीभूत?

डोंबिवलीतील पालिका रुग्णालयात यापूर्वी झालेल्या डॉक्टर मारहाण प्रकरणातही गुन्हा दाखल होण्यास २४ तास लागले होते. आता कोळसेवाडी पोलिसांच्या हद्दीत गुन्हा दाखल झाला असला तरी तीन दिवसांपासून आरोपी फरार आहे. "पोलीस सुरुवातीला चालढकल करतात आणि आरोपींची पाठराखण करतात; त्यामुळेच हल्लेखोरांचे मनोधैर्य वाढून अशा घटना वारंवार घडतात," असा घणाघाती आरोप डॉक्टरांनी केला आहे. फरार आरोपी विनीत देशमुख याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी मागणी वैद्यकीय संघटनांकडून लावून धरण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news