Kalyan Crime : कल्याण-आंबिवलीत फटका गँगची पुन्हा दहशत

धावत्या एक्स्प्रेसमधील प्रवाशाच्या हातावर दांडक्याचा वार आयफोन लंपास
Kalyan Crime
Kalyan Crime pudhari photo
Published on: 
Updated on: 

कल्याण : आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान फटका गँगची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. धावत्या प्रयागराज-आंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान फटका गँगची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.

धावत्या प्रयागराज-अमृत भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर दांडक्याने जोरदार प्रहार करून चोरट्यांनी त्याचा महागडा आयफोन पळवला. आयफोनची किंमत तब्बल १ लाख २२ हजार ७९६ रुपये आहे. या प्रकरणी सुरुवातीला भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांनी सुरु केला आहे.

Kalyan Crime
Teacher Harassment Case | धक्कादायक कृत्य ! शिक्षकाचे विद्यार्थिनीवर प्रेम जडले? प्रपोज केल्यानंतर थेट...

अमृत भारत एक्स्प्रेसने कल्याणहून भुसावळच्या दिशेने प्रवास करत होते. जनरल डब्यात मोठी गर्दी असल्याने ते दरवाजाजवळ उभे होते. ट्रेन आंबिवली स्थानकाजवळ येताच रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातावर दांडक्याने जोरदार प्रहार केला. या अचानक झालेल्या प्रहारामुळे त्यांच्या हातातील आयफोन खाली पडला.

चोरट्याने क्षणाचाही विलंब न करता मोबाइल उचलला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेप्रकरणी सुरुवातीला भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळ कल्याण-आंबिवली रेल्वे मार्गावर असल्याने हा गुन्हा आता कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Kalyan Crime
Mumbai Road Tender : मुंबईतील रस्त्‍यांच्या ८ हजार ६१४ कोटींच्या निविदा वादात!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.