Teacher Harassment Case | धक्कादायक कृत्य ! शिक्षकाचे विद्यार्थिनीवर प्रेम जडले? प्रपोज केल्यानंतर थेट...

Teacher Harassment Case | डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात या शिक्षकाला हजर केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत देण्यात आली.
Teacher Harassment Case
Teacher Harassment CaseAI Image
Published on: 
Updated on: 

डिचोली : डिचोली तालुक्यातील एका हायस्कूलमधील एका विद्यार्थिनीला वारंवार त्रास देणाऱ्या शिक्षकाविरोधात हायस्कूल व्यवस्थापनानेच डिचोली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या ३८ वर्षीय शिक्षकाला अटक केली आहे. डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात या शिक्षकाला हजर केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत देण्यात आली.

Teacher Harassment Case
Government Polytechnic | डिचोली शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 1.4 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक 'एनर्जी फॉर गुड टेक्नॉलॉजी सेंटर'चे उद्घाटन

डिचोली तालुक्यातील एका हायस्कूलमधील संबंधित शिक्षक हा गेल्या अनेक दिवसांपासून हायस्कूलच्याच विद्यार्थिनीला त्रास देत होता. तिला मागणी घालत होता. काही विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू पाठवत होता.

या प्रकरणाची माहिती त्या विद्यार्थिनीच्या पालकांना समजल्यावर त्यांनी हायस्कूल व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून हायस्कूल व्यवस्थापनाने या शिक्षकाला ताकीद दिली होती. त्यानंतर त्या शिक्षकाच्या कारवाया काहीशा कमी झाल्या होत्या.

Teacher Harassment Case
Government Polytechnic | डिचोली शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 1.4 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक 'एनर्जी फॉर गुड टेक्नॉलॉजी सेंटर'चे उद्घाटन

परंतु त्यानंतर संबंधित शिक्षकाकडून विद्यार्थिनीला त्रास देणे सुरूच राहिल्याने पालकांनी पुन्हा हायस्कूल व्यवस्थापनाकडे तक्रार केली. पोलिस तक्रार देण्याचा इशारा दिला. या तक्रारीवरून हायस्कूल व्यवस्थापनानेच संबंधित शिक्षकाविरोधात पोलिस तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी त्या ३८ वर्षीय अविवाहित शिक्षकाला अटक केली. त्याला डिचोली प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी डिचोली पोलिस निरीक्षक विजय राणे अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.